अहमदनगर

राज्य महिलाआयोगाची भीती दाखवून 5 लाखाचीफसवणुक  करणारा खंडणीखोर जेरबंद !

अकोले पोलिसांची कामगिरी

**************
अकोले प्रतिनिधी
एक वृध्द इसम व त्यांचे सुनेमध्ये गृहकलह व मालमत्तेच्या वाटपावरुन झालेल्या वादाचा फायदा घेत वृद्ध इसमाची 5 लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अकोले पोलिसांनी गजाआड केले!

सचिन बाळु रेवगडे (वय 28 वर्षे, रा हिवरगाव ता अकोले जि अ.नगर असे या आरोपीचे नाव आहे त्याने सदर वृध्द इसमास तुमच्या विरुदध तुमच्या सुनेने राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडे तक्रार दाखल केली असे सांगून वृद्धा कडून 5 लाख 35 हजार रुपये ची खंडणी उकळून फसवणूक केली आहे 


सदर तक्रार मध्ये तुम्हाला वीस वर्षे शिक्षा होईल अशी वृध्द इसमास भिती दाखवून, तसेच राज्य महिला आयोग मुंबई या वैधानिक संस्थेचे नावे बनावट कागदपत्र व बनावट शिक्के तयार करुन तसेच खोट्या सह्या करुन सदर वृध्द इसमास वेळोवेळी फोन व्दारे तसेच प्रत्यक्ष भेटुन वृध्द इसमाच्या असाहयतेचा फायदा घेतला

राज्य महिला आयोग व पोलीस स्टेशन यांचे कारवाईची भिती घालुन वेळोवेळी बळजबरीने रुपये 5,35,000/- रुपये रक्कमेची खंडणी गोळा करुन अधिक पैश्यांसाठी वृध्द इसमास पुन्हा पैश्याची मागणी करु लागला असता या वृध्द इसमाने पोलीस स्टेशन गाठले त्याचे तक्रारीवरुन अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 239/2022 भा.द.वि कलम 420,471,472,473,384,385 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर खंडणीखोर सचिन बाळु रेवगडे यास अकोले पोलीसांनी जेरबंद केले

असुन त्यास दिनांक 29.05.2022 रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्यास प्रथम दिनांक 01.06.2022 रोजी पर्यंत व त्यानंतर दिनांक 04.06.2022 रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर आरोपी सचिन बाळु रेवगडे हा पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असताना सदर आरोपी कडुन खंडणी घेतलेली 1,50,000/- रुपये रोख व कम्पुटर सेट, पेनड्राईव्ह, बनावट रबरी शिक्का, राज्य महिला आयोगाचे नावाने बनविलेले कागदपत्रे, गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन , व एक चारचाकी वाहन असा एकुण 5,50,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी याने त्याचे मोबाईलच्या सहायाने 8 वेगवेगळ्या नावाचे बनावट ई-मेलआयडी तयार करुन त्यावरुन खोट्या स्वरुपाच्या तक्रारी महिला आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदविल्या आहेत. तसेच आरोपी याने महाराष्ट्रातील विविध न्युज चॅनेल त्यात झी 24 तास, न्युज 18 इंडिया, साम टिव्ही यांचे नावे बनावट न्युज ब्लॉग तयार करुन  तसेच दिव्य मराठी या वृत्तपत्रात बनावट बातमी तयार करुन सदर खोट्या बातम्या प्रसारित करुन यातील फिर्यादीस खंडणी देण्यास भाग पाडले आहे.

सदर आरोपीताने या सारखे अजुन गुन्हे केले असल्याचे शक्यता असल्याने त्याबाबत सखोल तपास सुरु असुन सदर गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, आरोपी सचिन बाळु रेवगडे रा हिवरगाव ता अकोले हा अगर कुणीही इसम शासकीय यंत्रणेच्या नावाखाली बळजबरीने आपणाकडुन खंडणी मागुन तुमची फसवणुक करत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला हजर होवुन आपली तक्रार नोंदवावी. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील यांनी केले आहे. 

सदरची कारवाई  पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील व . अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर  व . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे, व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोना विठ्ठल शेरमाळे, पोना अजित घुले, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ संदिप भोसले, पोकॉ प्रदिप बढे, तसेच पोना फुरकान शेख यांनी केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे  हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button