अहमदनगर

नगर औरंगाबाद मार्गावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या,अन्यथा आंदोलन.–बद्रीनाथ चिंधे


सोनई–( विजय खंडागळे)-

नगर औरंगाबाद रोडवरील सध्या सुरू असलेल्या सी.
एन.जी.गॅस पाईपलाईन कडून काम चालू असून त्यामुळे औरगाबाद रस्त्यालगत असणाऱ्या गावालगत असणाऱ्या शेतकऱयांच्या काही जमिनी गेल्या असुन आणि कालव्याचे चारी सुद्धा बंद केल्याने शेतातील पिके जळून खाक झाले असून त्याची नुकसानभरपाई न मिळाल्यास पंधरा दिवसात शेतकरी संघटना ,मनसे, आदी पक्षाने तहसीलदार लेखी तक्रार दाखल केली.आहे तसे निवेदन देण्यात आले आहे.
नगर – औरंगाबाद रस्त्यावरील सध्या सी.एन.जी.गॅस पाईपलाईन चे काम सुरू असून ठिकठिकाणी अनेक शेतकऱ्यांची जमिनीचा काही भागाची मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्या शेतातील पिके अक्षरशः जळाली आहे.आर्थिक हानी मोठया प्रमाणात झाली आहे.
त्या अनुषंगाने नेवासा तालुक्यातील बाभुळवेढा येथे शेतकरी संघटनेच्या ( शरद जोशी प्रणित) वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी नुकसान झालेल्या शेतकरी संघटना बद्रीनाथ चिंधे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक्ष पाहणी करून सरकारवर टीका केली.
हे काम कल्पतरू ठेकेदाराने घेतले असून मनमानी,गुडगिरीला हाताशी धरून कामे करत आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या पाणी वितरिका पूर्णपणे बुजून पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप या ठेकेदाराने केले आहे.त्यामुळे शेतातील लाखो रुपयांची पिके पाण्याअभावी जळाली आहे.नुकतीच शेतकरी बद्रीनाथ चिंधे यांच्या वस्तीवर शेतकरी संघटनेची बैठक घेऊन नुकसानभरपाई न मिळाल्यास आंदोलन हाती घेण्याचा इशारा संघटनेचे वतीने दिला आहे.
या प्रसंगी प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ चिंधे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, उस्थळ सेवा संस्थेचे अध्यक्ष देविदास वाघ,प्रशांत सुकाळकर,किशोर सुकाळकर,राधाभाऊ वाघ, संदीप आढाव,जनार्धन पिटेकर,सुनील कोतकर, अशोक बर्डे,शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष सोपान रावडे,शेतकरी संघटनेचे गोरक्षनाथ साळुंके, मनसेचे तालुका अध्यक्ष मीरा ताई गुंजाळ, जैशिंग गायकवाड, डॉ.सुरेश सुकाळकर,राजेंद्र सानप, राजेंद्र शेळके,संभाजी कोतकर, आदी सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे निवेदन कामगार तलाठी एस .जे बांगर, कृषी सहायक गवई,पर्वेक्षक व्ही.एस.जाधव यांनादेण्यात आले.

तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित असलेल्या विभागाला सूचना देऊन ह्या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन न्याय मिळवून द्यावा.–
—त्रिंबक भदगले, अध्यक्ष शेतकरी संघटना, नेवासा.
,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आज डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो,इंजिनिअर चा मुलगा इंजिनिअर होऊ पाहतो,पण माझ्या महाराष्ट्रतला शेतकरीचा एकही मुलगा म्हणत नाही मला शेतकरी व्हायचं?कारण शासनाची शेतकऱ्यां बद्दल असलेली उदानसीता व जाणीवपूर्वक केलेली डोळेझाक, साहेब ही परिस्थिती बदलेल का?–बद्रीनाथ चिंधे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button