पदाचा उपयोग जनतेसाठी केला पाहिजे : सभापती काशिनाथ दाते

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पदाचा उपयोग जनतेसाठी केला पाहिजे असे मत जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले
वारणवाडी येथे गावठाण ते रोकडे वस्ती, कार रस्ता व कोकाटे वस्ती रस्ता सुधारणा करणे-७ लक्ष, काशिदवस्ती रस्ता सुधारणा करणे-३ लक्ष, स्मशान भूमी विकास करणे -५ लक्ष, असा १५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष मोरे होते
यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले वारणवाडी गावात गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोन कोटी रुपयांच्या पुढे विकास कामे केलेत व राहिलेली कामेही मीच करणार, काळजी करू नका हे गाव माझे आहे तुम्ही मला गेल्या ४० वर्षांपासून ओळखत आहे आपल्या परिसरात एवढे विकास काम झाले त्याचे निमित्त मीच आहे पोखरी विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणूक चालू आहे यासंदर्भात बोलताना सभापती म्हणाले कोणतीही घाई करू नका, कोणाच्याही दबावाला, प्रलोभनांना बळी पडू नका आपल्या सर्व उमेदवारांनी सभासदांना भेटा, मतदारांना चांगले काम करण्याची खात्री द्या आपले सर्वच उमेदवार पाचशे पेक्षा जास्त फरकाने विजयी होतील कोणी कितीही वल्गना करू द्या, मी परिसरातील सर्वांनाच मदत करतो जे माझ्याकडे येथील त्यांचा पक्ष मी बघत नाही. आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या गटातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात विकासकामे केली.

यावेळी वारणवाडी येथे शिवसेना पक्षाची नवीन कार्यालयाचे उद्घाटन सभापती दाते यांनी केले कार्यालयामार्फत पक्षवाढीसाठी काम करण्याची सूचना शाखाप्रमुख व कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या या कार्यालयात संगणक देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले जेणेकरून गोरगरीब जनतेची रेशन कार्ड काढणे, संजय गांधी निराधार प्रकरण करण्यासाठी तसेच कृषी खात्याची ऑनलाईन प्रकरणे करण्यासाठी याचा उपयोग होईल या कार्यालया मार्फत समाजाचे हिताचे काम करता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एखादे पद मिळाल्यास त्याचा उपयोग जनतेची सेवा यांची कामे मार्गी लावण्यासाठी केला पाहिजे
यापुढे निवडणुकीत शिवसेना उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन खूप चांगले आमचे स्वागत हे चांगले झाले सर्वांना धन्यवाद देतो पोखरी सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा नारळ वारणवाडी गणपती मंदिरात वडगाव सावताळचे आदर्श सरपंच बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते वाढवण्यात आला.
दाते सरांचा विकास कामांचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यात आहे, आपणा सर्वांना विकासासाठी, आधारासाठी त्यांची गरज आहे. दाते सरांचे राजकारण इतरांप्रमाणे नाही, मुत्सद्दी, अभ्यासू आहे त्यांच्या विचारात तालुका सुजलाम, सुफलाम असला पाहिजे तालुक्याचे आरोग्य, शिक्षण, रस्ते चांगले झाले पाहिजे, मी विरोधकांवर टीका करणार नाही पण माझ्या नेत्याचे गुण सांगितले पाहिजे. त्यांनी विकासाची दिशा निश्चित केली, पण सध्या अनेक प्रलोभन दाखवून माणसे आकर्षित केले जातात, अशी जिल्ह्यात, राज्यात खूप माणसे आहेत सरांकडे वैचारिक बैठक आहे, ठाम विचार आहे या जोरावर त्यांनी तालुक्यात चाळीस वर्ष जनसामान्यांवर राज केला आहे
:आदर्श सरपंच बाबासाहेब शिंदे, वडगाव सावताळ
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख शुभम टेकुडे, सोशल मीडिया प्रमुख दत्ता वाडेकर, सरपंच सतीश पवार, अण्णा पवार, वारणवाडी सरपंच संतोष मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास शिंदे, शाखाप्रमुख शिवम पवार, रंगनाथ दाते, बाबाजी खैरे, माजी सरपंच अंकुश काशीद, ग्राम. सदस्य संजय काशीद, शाखाप्रमुख संदीप काशीद, उपशाखा प्रमुख दीपक काशीद, युवासेना शाखा प्रमुख विशाल कोकाटे, युवा सेना उपशाखा प्रमुख बाबासाहेब काशीद, बाबासाहेब रोकडे, गणेश काशिद,बाबासाहेब काशीद, महिला आघाडी प्रमुख अलका पानमंद, रंजना रोकडे, संपत आहेर, संतोष आहेर, चेअरमन संतोष गुंजाळ, उपसरपंच परसराम शेलार,महेंद्र काशीद, साहेबराव काशीद, पांडुरंग काशीद, गंगाराम काशीद ,मारुती काशीद, भाऊसाहेब कोकाटे, बबन काशीद, भाऊ काशीद, बाबाजी कोकाटे, बबन थोरात, सखाराम थोरात, बाजीराव पानमंद, गणपत चौधरी, पंडीत गायखे, रावसाहेब काशिद, विनायक थोरात, गणपत कोकाटे, बबन कोकाटे, सिताराम काशीद, अशोक काशीद, रावसाहेब कोकाटे, भाऊ बाबू काशीद, विष्णू कोकाटे, भाऊसाहेब कोकाटे, विशाल कोकाटे, बाबू काशीद, विक्रम कोकाटे, गणेश काशीद, इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कोकाटे यांनी केले तर आभार बाजीराव पानमंद यांनी मानले