राजूर -कोतुळ रस्ता प्रवासी व रुग्णांच्या मुळावर!

रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन
संजय फुलसुंदर
कोतुळ-अकोले तालुक्यातील राजूर -कोतुळ रस्त्याची ठिकठिकाणी अतिशय दुर्दशा झाली आहे पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर धामणगाव पाट येथे सह्याद्री विद्यालयाजवळ रस्त्याची अतिशय दैना अवस्था झाली आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या आकाराचे खड्डे पडल्याने अनेक अपघात या ठिकाणी झाले आहे मोठ्या व लहान वाहनांना रस्ता काटताना कसरत करावी लागत आहे या ठिकाणचे रस्ते ची तातडीने दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी धामणगाव पाट व कोतुळ परिसरातील नागरिकांनी केली आहे रस्त्यावरील खड्डे तातडीने न बुजवल्यास परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे
रस्त्याचे दोन्ही बाजूने साईडपट्या खोल झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे यामुळे एकाच वेळी रस्त्याने दोन गाड्या जाणे अवघड बनले आहे
सार्वजनिक बांधकाम विभाग राजुर यांच्या अखत्यारित रा .मा .23 हा रस्ता येतो पावसाळ्यात या हा रस्ता खराब झाला आहे। पाऊस उघडला आहे बांधकाम विभागाने रस्ता ची सुधारणा करावी
रोहिदास भोर
मा उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अकोले

कोतुळ ग्रामीण रुग्णालयात आदिवासी भागातून अनेक रुग्ण उपचारासाठी येतात रात्री बे रात्री त्यांना पुढील उपचारासाठी अकोले ,अहमदनगर, नाशिक संगमनेर येथे न्यावे लागते या ठिकाणी जाण्या साठी धामणगाव पाट मार्गे हा एकच रस्ता आहे परंतु रस्ता खराब असल्याने रुग्णांना अतिशय त्रास सहन करावा लागतो वाहन वेळेत पोहोचत नाही यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते रुग्णवाहिकेत रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात वेळेत पोहोच करणे हे आमचे कर्तव्य असते
असिफ पठाण
रुग्णवाहिका वाहन चालक ,कोतुळ
धामणगाव पाट गावाजवळ सह्याद्री विद्यालया जवळील हा रास्ता अतिशय धोकादायक बनला आहे सार्वजनिक बांधकाम खाते याकडे डोळेझाक करत आहे असा आरोप केला जात आहे या ठिकाणी खड्डे चुकवताना अनेक अपघातही झाले आहे
