पिंपरी शहाली येथे जवान . बंडू नवथर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
गडचिरोली येथे तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे. यामध्ये जवान बंडू बन्सी नवथर हे शहीद झाले आहे.जवानावर गोळी झाडल्यानंतर या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान नवथर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे आणण्यात आले .

त्यावेळी सैन्यदल व गावकर्यांकडुन त्यांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामुळे सैन्य दलाकडून तीन वेळेस हवेत गोळीबार करून मानवंदना देण्यात आली या अंत्यविधीसाठी राजकीय सामाजिक शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शहीद नवथर यांच्या मागे आई वडील पत्नी मुलगा मुलगी तीन चुलते असा मोठा परिवार होता.
अंत्यविधीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जयाताई गडाख, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे, कॉ.बाबा आरगडे, ज्येष्ठ साहित्यिक संजय चव्हाण, दत्तात्रय निकम, नवनाथ महाराज काळे, बाळासाहेब महाराज नवथर, कल्याण महाराज पवार,अशोक चौधरी, सर्जेराव घाणमोडे, मोहन गहाळ ,देविदास भेंडेकर, संतोष घुले , अंजन चव्हाण,दादा शिंदे , नागे मेजर
रमेश नवथर, विष्णु घुले, पत्रकार शहाराम आगळे, गणेश मुळे,आदी यावेळी उपस्थित होते.
