शेतकरी आंदोलकांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात अन्यथा राज्यभर आंदोलन करणार -डॉ, कृषिराज टकले

पुणतांबा प्रतिनिधी
पुणतांबा येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात 1 जून 2022 पासून धरणे आंदोलन सुरु केले आहे या आंदोलनास स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ,कृषिराज टकले आंदोलकांची भेट घेवून पाठिंबा दिला
याप्रसंगी स्वाभीमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी शेतकरी संप करुन सरकारला हादरवले होते तरी शासनाने आश्वासन देऊन मागचे आंदोलन दडपवले होते आता शेतकरी आंदोलनातील प्रश्न सोडवा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल असा ईशारा दिला
याप्रसंगी पुणतांबा किसान क्रांन्तिचे डॉ ,धनंजय धनवटे ,बाळासाहेब चव्हाण, धनंजय जाधव,सुहास वहाडणे,मराठा भुषण चंद्रकांत लबडेआदि उपस्थीत होते