
दत्तात्रय शिंदे
नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे गावठी कट्टे व जिवंत काडतूस विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाहरुख शेख (रा. घोडेगाव,ता.नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दिनांक 17/09/2023 रोजी पोनि / श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा
मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे विजय भारशंकर रा. नेवासा हा हॉटेल वैष्णवीसमोरील वानकर पार्कींग, शनिशिंगणापुर या ठिकाणी त्याचे कब्जात
विनापरवाना बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगुन विक्री करण्याकरीता येणारआहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. मनोहर गोसावी, पोना. रविंद्र कर्डिले, पोना. संदीप दरंदले, पोना. संतोष लोढे, पोना. गणेश भिंगारदे, संतोष खैरे अशा पोलीस अंमलदार यांना माहिती कळविली व पंचाना सोबत घेवुन, खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
पथकाने लागलीच शनिशिंगणापुर येथील हॉटेल वैष्णवीचे समोरील बानकर पार्कंगमध्ये सापळा लावुन त्या ठिकाणी एक संशयीत इसम मिळुन आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय विलास भारशंकर वय 26 वर्षे, रा. बन्हाणपुर, ता. नेवासा, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेता त्यांचे
अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुस मिळुन आले. त्याबाबत त्यांचेकडे बारकाईने विचारपुस करता त्याने गावठी कट्टा व जिवंत
काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन इसम नामे विजय विलास भारशंकर यास शनिशिंगणापुर येथील हॉटेल वैष्णवीचे समोरील बानकर पार्कीगमधुन ताव्यात घेवुन त्याचे कब्जामध्ये 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा, 500 /- रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 30,500/- रू. किं.चा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोना. गणेश प्रभाकर भिंगारदे यांनी शनि शिंगणापुर येथे दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. 178/2023 आर्म अॅक्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी विजय विलास भारशंकर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न या सारखा गंभीर स्वरूपाचा शरिराविरुध्दचा एक गुन्हा दाखल आहे. गु.र.नं. 69 / 2021 भादविक 307, 212, 20134 सह आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे सदर गुन्हा हा शनि शिंगणापूर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आह शनिशिंगणापुर पोलीस पुढील तपास करीत आहे.