
अकोले /प्रतिनिधी
सरकारी अधिकारी कर्मचारी वर्ग कामात कामचुकार व हलगर्जीपणा करतात …परंतु ग्रांमपचायतीचा कर्मचारी हा कमी मानधनावर गावची जनसेवा करतो असे प्रतिपादन लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे यांनी केले
अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील ग्रामपंचायत कर्मचारी दगडू आरोटे व बाळासाहेब आरोटे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवले त्यामुळेच आज त्यांचा सर्व गावाने एकत्रित येऊन जो सेवापुर्ती सोहळा केला तो नक्कीच इतर गावांना देखील आदर्श ठरेल असे अकोले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी डॉ किरण लहामटे म्हणाले
अकोले तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचे प्रतिक असलेल्या चितळवेढे येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी ह .भ.प. दगडु अप्पा आरोटे व बाळासाहेब बाबाजी आरोटे यांचा सपत्नीक यथोचित सन्मान लोकप्रिय आमदार डॉ. किरण लहामटे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, ह.भ.प दिपक महाराज देशमुख, . सेवानिवृत्त गुणवंत अधिकारी आर डी आरोटे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक गिताराम आरोटे सरपंच ताईबाई पथवे. माजी सरपंच मारुती आरोटे चितळवेढे सोसायटीचे संचालक विश्वंभर आरोटे . उपसरपंच नवनाथ गोविंद आरोटे, ग्रामपंचायत सदस्या सौ सुजाता बाळासाहेब आरोटे.शालीनी प्रेमानंद आरोटे मंगल पथवे.नामदेव पथवे.भाऊसाहेब पथवे माजी सरपंच सौ सरला भागवत.सौ सेवानिवृत्त अधिकारी वसंत अण्णा आरोटे प्रा किरण भागवत ,प्रा.यशंवत आरोटे, देवराम गणपत आरोटे. रामनाथ तुकाराम आरोटे ,कामगार पोलीस पाटील किसन आरोटे, पंचायत समिती अधिकारी सुनील मोहटे ,माऊली आरोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य हरीदास आरोटे. ,चितळवेढे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण आरोटे.,,बाळासाहेब कारभारी आरोटे ,.नवनाथ आनंदा आरोटे,.दतात्रय सदाशिव आरोटे,.शेखर आरोटे, यासह सर्व महीला ग्रामस्थ उपस्थित होते सुत्रसचांलन किरण भागवत यांनी केले तर यशवंत आरोटे यांनी आभार मानले

.…चितळवेढे ,विठे येथिल शेतकऱ्यांचे संपादित जमिनी वर लागलेले महाराष्ट्र शासन नावं कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तलाठी सौ सोनाली वलवे -देशमुख यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या वतीने अकोले तालुका अध्यक्ष संदीप घोडके . जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका सचिव संतोष नाईकवाडी तालुका उपाध्यक्ष दौलत नवले तालुका कार्यकारिणी सदस्य संदिप वाकचौरे.गोरख भांगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
———–