जांभळेवाडी केळी ओतूर केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप .

राजूर /प्रतिनिधी
जांभळेवाडी व केळी ओतूर केंद्रातील एकुण १२ शाळांतील २५० विद्यार्थ्यांना दप्तर, स्टेशनरी, एक पाऊच, कंपास पेटीतील साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अकोले पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी मा. अशोक धिंदळे यांनी केले होते.
या कार्यक्रमास कोतुळ बीट चे विस्तार अधिकारी मा. कुमावत यांचे सहकार्य मिळाले तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मेंगाळ सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.सुत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय वाजेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भास्कर दिघे सर यांनी केले.
वकिल संघटनेचे अध्यक्ष मा. राजेश खळदकर साहेब यांनी सांगितले कि आम्ही आदिवासी भागातूनच शिक्षण घेऊन पुढे गेलेलो आहोत. आम्ही सिमेंटच्या जंगलात राहतो. आज खरंच आम्ही आमच्या मायभूमीतील लेकरांना प्रोत्साहन म्हणून हे साहित्य देत आहोत. म्हणून सर्व मुलांनी खूप अभ्यास करून आमच्या सारखे वकील होऊन देशाची व समाजाची सेवा करावी अशी आमची सर्व टीमची इच्छा आहे.यावेळी वकील संघटनेचेॲड.प्रविण नलावडे, के. आर. रावळ, प्रल्हाद कदम, अजय कपिले, विजय नलावडे, दिलीप जगताप, गुरुदत्त चिल्लाळ,मोरेश्वर राऊत, निलेश नलावडे, सुरेश कदम, कल्याण शिंदे, प्रतिक कदम, नेहा जांभळे,शिल्पा तापकीर, जयश्री बीडकर, शुभांगी पाटणकर, वैशाली शिर्के उपस्थित होते.
केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. मेंगाळ साहेब यांनी सांगितले की आमची मुले खरोखर हुशार आहेत, भविष्यात ते डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, मुख्याध्यापक होतील. ते भविष्यात उंच भरारी घेतील अशी मी ग्वाही देतो.
या कार्यक्रमाचे नियोजन केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांनी केले.
आभार लाटणे सर व गोडे सर यांनी मानले.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ साहेब ,कोतुळ बीट चे विस्तार अधिकारी मा. कुमावत साहेब व सर्व विस्तार अधिकारी या सर्वांनी उपक्रमाचे कौतुक व स्वागत केले. कार्यक्रम प्रसंगी विजय घनकुटे सर, विकास भागीत सर, बाळू वायळ सर,ठोंगिरे सर, अरुण वायळ सर, गोविंद घनकुटे सर, धिंदळे सर, सोमनाथ मुठे सर, उकिरडे सर, अरोटे मॅडम, जाधव मॅडम, गडगे सर उपस्थित होते.
