अहमदनगर

पारनेरच्या लोकप्रतिनिधींची दंडकशाही लोकतंत्रसाठी घातक : खा. सुजय विखे पाटील

आमदार निलेश लंकेंवर सुजय विखे यांचे जोरदार टीकास्त्र

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
सध्या पारनेर तालुक्यात सत्तेच्या जोरावर लोकप्रतिनिधी प्रशासनाचा करत असलेला गैरवापर हा लोकतंत्र साठी घातक आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने तालुक्यात प्रशासकीय व पोलीस यंत्रणेचा वापर होत असून शिवसेना व भाजप तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र या तालुक्यात सुरू असून तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहेत त्यामुळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना जनताच आता त्यांचा खरा चेहरा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही असे वासुंदे येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेतील कार्यक्रमात बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता टिकास्त्र सोडले. तसेच यावेळी पुढे बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की तालुक्यातील जनतेच्या हक्कासाठी व मदतीसाठी मी यापुढील काळात काम करत राहणार आहे. मतासाठी राजकारण न करता जनतेच्या हितासाठी तालुक्यात राजकारण मी करत आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करणार असून विकासाच्या माध्यमातूनही काम करणार आहे.
तसेच यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणाले की सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना आपल्या तालुक्यात राबवल्या जात असून वयोश्री योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दिव्यांग, अपंग, गरीब जेष्ठ व्यक्तींना या योजनेचा मोठा लाभ मिळत असून आपल्या पारनेर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी असून हे मोठे पुण्याचे काम आहे.
वासुंदे येथे राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत जीवनावश्यक साहित्य वाटप समारंभ खासदार डॉ सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, युवा नेते सुदेश झावरे पाटील, जेष्ठ नेते सीताराम खिलारी, विश्वनाथ कोरडे, राहुल पाटील शिंदे,
यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यादरम्यान राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत टाकळी ढोकेश्वर येथे घेण्यात आलेल्या शिबिरातील टाकळी ढोकेश्वर, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल, ढोकी, वासुंदे, वडगाव सावताळ, गाजदीपुर, खडकवाडी, मांडवे खु., देसवडे इ. गावातील ज्येष्ठ लाभार्थ्यांना वासुंदे या ठिकाणी साई प्रसाद मंगल कार्यालयामध्ये मोफत साहित्य वाटप करण्यात आले.


यावेळी पारनेर भाजप तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनीताई थोरात, पारनेर भाजप शहराध्यक्ष किरण कोकाटे, मा. सभापती अरूणराव ठाणगे, पारनेर तालुका भाजप युवामोर्चा सरचिटणीस सागर मैड, महिला तालुकाध्यक्ष उषाताई जाधव दिलीप उदावंत, ऍड. बाबासाहेब खिलारी, भगवान वाळुंज, निजाम पटेल, खंडू भाईक, किसन धुमाळ, उपसरपंच शंकर बर्वे, भाऊ सैद, नारायण झावरे, रा. बा. झावरे, अमोल साळवे, संजय भोर, शुभम टेकुडे, अक्षय गोरडे, योगेश वाळुंज, बाळासाहेब पाटील, दिलीप पाटोळे, रणजीत पाटील, शरद पाटील बाळासाहेब झावरे, लहानु झावरे, तसेच तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button