माका आठवडे बाजारात स्वछतागृहाच्या गैरसोयीने नागरिकांत संताप

माका गावं तसं चांगलं पण ……
.
माका प्रतिनिधी_
नेवासे तालुक्यातील माका गावं जिल्ह्यात
तसेच तालुक्यात बाजारपेठेचे गावं म्हणुन ओळखले जात
सुमारे नऊ ते दहा हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे
आठवडे बाजार मोठया मोठ्या प्रमाणात भरतो या ठिकाणी परिसरातून हजारो लोक आठवडे बाजारात येत असतात या आठवड्या बाजारात लाखोंनी उलाढाल होते आणि कर रूपाने स्थानिक प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्नही जमा होते कित्येक वर्षापासून संबधित प्रशासनास ग्रामस्थांकडुन सुचना, कल्पना देवुनही सार्वजनीक स्वच्छतागृहाची सोय होत नसल्या कारणाने नागरिकांना,महिलांना बाजारतळावरील मंदिरांच्या प्रांगणात तसेच शेवगाव पांढरीपुल रस्त्यालगत उघड्यावरच लघुशंका करावी लागते
, नेवासे,शेवगाव, पाथर्डी व नजीकच नगर अशा तिन चार तालुक्याच्या सिमेलगत असणारा माका गावचा आठवडा बाजार वर्षेनुवर्षे पुर्वीपासुन आठवडे बाजार दर सोमवारी मोठ्या प्रमाणात भरत असल्याने

गावातील तसेच शेजारच्या गावातून बाजार दिवशी तसेच महीला,नागरिक, शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ मोठी असते. या ठिकाणी शैक्षणीक विद्यालये, कृषी संबधित दुकाने मोठमोठी शॉपिंगसेंटर, हॉटेल, इतर दुकाने, जास्त प्रमाणात असल्याने व्यापारी वर्गातुन आर्थिक उलाढालीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व बाबीतुन संबधित प्रशासनास कराच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असे असतानाही
बरेच वर्षेपासून स्वछता गृहाचा प्रश्न जाणूनबूजून मार्गी लागत नसल्याने नागरिकांतुन’ संताप व्यक्त केला जात आहे