इतर
अकोल्यात एकाधिकार धान खरेदी सुरू, आमदार लहामटे यांनी केले उदघाटन!

अकोले प्रतिनिधी
आदिवासी विकास महामंडळ उप-प्रादेशिक कार्यालय राजूर अंतर्गत,अकोले तालुक्यात आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम २०२२/२३ अंतर्गत गोदाम राजूर। व कोतुळ येथे धान खरेदी चे उद्घाटन आमदार डॉ किरण लहामटे यांचे हस्ते करण्यात आले .

परिसरातील शेतकरी बांधवांनी ३१ जानेवारी पर्यंत आपले धान घालावे व ह्या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले

यावेळी सरपंच सौ. पुष्पाताई निगळे, भीमाशंकर कवडे, अरुण माळवे, प्रमोद देशमुख, ओंकार नवाळी,संतोष बोटे ,शुभम एलमामे ,मुकुंद लाहमटे ,दत्ता निघळे भगवान पवार आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
——–