कऱ्हे येथील शाळेत पार पडली व्यंगचित्रांची कार्यशाळा.

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कऱ्हे तेथे नुकतीच व्यंगचित्र ओळख ही कार्यशाळा पार पडली. यावेळी संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक मा. अरविंद गाडेकर उपस्थीत होते. गाडेकर यांनी प्रथम व्यंगचित्रांचा अर्थ, इतिहास, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली. प्रात्यक्षिकासह व्यंगचित्र कशी काढली जातात हे दाखविले विद्यार्थ्यांनाही पुढे येऊन व्यंग चित्र काढण्यास प्रोत्साहन दिले. आणि यासाठी त्यांच्यातही चढाओढ लागली. चेहऱ्यावरील विविध हावभाव, साध्यासोप्या रेषा, काही मुळाक्षरे यातून चित्र कशी काढायची हे खूप मनोरंजन पद्धतीने सांगण्यात आले. त्याचबरोबरच मुलांना घरी व्यंगचित्र काढण्याची तयारी कशी करावी याचेही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कऱ्हेश्र्वर माध्यमिक विद्यालातील सर्व विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास निमित्त होते लेखक गणेश महादू सानप यांची मुलगी कु. आदर्शा ही येथील शाळेत इयत्ता पहिली या वर्गात शिकत असुन तिचा वाढदिवस नेहमीचं काही उपक्रम घेऊन राबविला जातो. यावेळेस तिच्या वाढदिवसानिमित्त मुलांना गोड पदार्थ देण्यात आला, केकही शाळेत कापला गेला. त्याचबरोबर गाडेकर यांच्या व्यंगचित्रांची ओळख या मागदर्शन पर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. दरम्यान गाडेकर यांचा सत्कार शाळेतील शिक्षक आणि शाळा समिती यांच्याकडून करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पार्वती गाडेकर मॅडम, उत्तम गायकवाड सर, गणेश सांगळे सर, हेमंत पांडे सर, संजय नवले सर, संजय बांबळे सर, निलम रूपवते मॅडम आदी शिक्षक शाळा समितीतील अधक्ष्य, सदस्य, विकास गुळवे, मच्छिंद्र गुळवे तसेच अर्चना सानप, ज्ञानेश्वर गरुड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
