कोतुळ येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे उज्वला एज्युकेशन संस्थेच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात यावर्षीच्या शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत जल्लोषात स्वागत करण्यात आले
कोरोना मुळे गेल्या काही वर्षापासून काळात विद्यार्थी शाळेपासून दूर होते अनेक दिवसाच्या खंडानंतर यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू झाले या सत्रातील आजच्या पहिल्याच दिवशी विद्यालयात विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले विद्यार्त्यां चे
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली
आज बुधवार दि. १५/०६/२०२२ रोजी सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी विद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पुष्प देऊन व सवाद्य मिरवणूक काढून नवीन प्रवेशार्थी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विद्यालयात दिमाखात साजरा करण्यात आला.