इतर

करमाळा तहसील कार्यालयावर बहुजन संघर्ष सेनेचे निदर्शने

  करमाळा/प्रतिनिधी

लंम्पी आजाराची लस सरसकट गाई म्हशींना मोफत टोचावी, मार्च, एप्रिल,मे महिन्यात गाळपास गेलेला शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले मिळाली पाहिजेत या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी करमाळा तहसील कार्यालयावर आज निदर्शने केली

करमाळा तालुक्यातील ऊस नगर जिल्ह्यातील कारखान्यांना पुणे जिल्ह्यातील कारखान्याला व सोलापूर जिल्ह्यातील कारखान्याला मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये गेलेला आहे परंतु शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत बिले मिळालेली नाहीत व लंम्पी  नावाचा आजार गाई आणि म्हशींसाठी अत्यंत घातक आहे तेव्हा लंम्पी आजाराची प्रतिबंधक लस गाई व म्हशींना सरकारतर्फे मोफत लसीकरण करण्यात यावे    लंपी नावाचा जो आजार आहे त्या आजाराची प्रतिबंधक लस सरकारने मोफत जनावरांना टोचली पाहिजे जर सरकारने मोफत लस टोचली तर शेतकऱ्यांचं पशुधन वाचेल व शेतकऱ्यांची भीती निघून जाईल तेव्हा सरकारने ताबडतोब मोफत गाई म्हशींना प्रतिबंधक लस टोचली पाहिजे नाही टोचल्यास मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे बहुजन संघर्ष सेना आंदोलन करेल असे राजाभाऊ कदम यांनी सांगितले त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस इंदापूर तालुक्यातील घागरगाव कारखान्याला पंढरपूर तालुक्यातील आष्टी कारखान्याला श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा हिरडगाव कारखान्याला गेलेला आहे परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मार्च एप्रिल मे महिन्यातील उसाची बिले मिळाली नाहीत

तत्काळ शेतकऱ्यांची बिले मिळावीत यासाठी साखर आयुक्त पुणे यांना मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित कारखान्यांवरती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत जर 15 दिवसाच्या आत कारखान्यांनी बिले दिली नाहीत तर बहुजन संघर्ष सेना सबंधित चेअरमनच्या बंगल्यांवरती मोर्चा  काढेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा दिला यावेळी बहुजन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली यावेळेस तहसील कार्यालयासमोरील परिसर दणाणून गेला आंदोलनकर्त्यांचे निवेदन नायब तहसीलदार जाधव साहेब यांनी स्वीकारले व आपल्या मागण्या वरिष्ठांना कळवतो असे सांगितले

यावेळी तालुका अध्यक्ष अंगद लांडगे, तालुका उपाध्यक्ष तुकाराम घोंगडे, तालुका सचिव मारुती भोसले, जिल्हा सचिव दादा चव्हाण, तालुका महासचिव आप्पा भोसले, महादेव कडाळे, पोत्रे सरपंच विष्णू रंधवे, प्रेम कुमार सरतापे, मच्छिंद्र गायकवाड, अळजापुरचे  सरपंच रवी घोडके, टाकळी चे सरपंच कोंडीबा चीतारे, श्रीरंग लांडगे, अधिक शिंदे, प्रेमचंद कांबळे, कालिदास कांबळे, महादेव कडाळे, कालिदास लुच्चे, बाळासाहेब खंकाळ  आरपीआय सरचिटणीस, मारुती जंजाळ, आरपीआय कार्याध्यक्ष राजू सरतापे, सुरेश जाधव, वसंत पवार प्रकाश भोसले, अशोक भोसले, हनुमंत खरात, राहुल खरात, युवराज जाधव, बाळू गायकवाड, नागनाथ भालेराव, दिगंबर हजारे, बहिरू घोंगडे, महादेव नवगिरे,रोहन मोहिते, किसना पवार, राहुल पांढरे, आदी कार्यकर्ते शेतकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button