अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्रा चे राज ठाकरेंनी केले कौतुक !

.
संगमनेर प्रतिनिधी
बाल गंधर्व कलादालन पुणे येथे जागतिक व्यंगचित्रकार दिन निमित्त आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव आयोजित केला आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी केले.
संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी काढलेले दोन व्यंगचित्रे या प्रदर्शनात समाविष्ट आहेत. राज ठाकरे यांनी अरविंद गाडेकर यांच्या व्यंगचित्राला भेट दिली आणि कौतुक केले. यावेळी अरविंद गाडेकर यांनी त्यांचे स्वलिखित व चित्रित १२१ व्यंगचित्रे समाविष्ट असलेले पुस्तक राज ठाकरे यांना भेट दिले.
२२८ व्यंगचित्रे प्रदर्शनात होती पैकी ७६ महाराष्ट्रीयन, २० इतर राज्य आणि १३२ परदेशातील व्यंगचित्रे असे एकूण २३२ व्यंगचित्रे कलादालनात ५,६,७ मे पर्यंत प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुली आहेत. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील आघाडीचे व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, चारुहास पंडित प्रभाकर वाईरकर, प्रभाकर झळके, संजय मिस्त्री तसेच अनेक प्रसिद्ध व्यंगचित्रकार उपस्थित आहेत. पुणेकरांनी या प्रदर्शनास गर्दी केली होती.