अगस्ति एज्युकेशन संस्थेचे दहावीच्या परिक्षते घवघवीत यश

अकोले – प्रतिनिधि
येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती विद्यालय अकोले या विद्यालयाचा मार्च
२०२२ चा माध्य.शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शेकडा निकाल ९७.८० एवढा लागला असून विद्यालयाचा वेदांत दिघे ९७.८० गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला याच संस्थेच्या कळसेश्वर विद्यालय कळसची विद्यार्थीनी पायल वाकचौरे हिने ९७.६० गुण मिळवत तालुक्यात व्दितीय तर मुलींमध्ये तालुक्यात प्रथम याच विद्यालयाची वैष्णवी चौधरी हिने ९६.८० गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांकाचा मान मिळविला.
विशेष बाब म्हणजे अगस्ती विद्यालयाचा जेवढा निकाल लागला तेवढेच शेकडा गुण वेदांत दिघे
याने मिळविले. अगस्ति विद्यालयात अनुक्रमे व्दितीय येण्याचा मान सिद्धी नेहे ९५.६०, तृतीय ऐश्वर्या आवारी ९५.४०, चतुर्थ आदर्श झोळेकर ९५.०० गुण मिळविले. विद्यालयातील तब्बल १९ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवत बाजी मारली तर ११५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी थोर स्वातंत्र्य सेनानी गुरुवर्य बा.ह. नाईकवाडी यांनी घालून दिलेलाआदर्श डोळ्यासमोर ठेवत विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळविले.
या यशाबद्दल संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी, अध्यक्षा शैलजा पोखरकर,
संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा तथा अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, सचिन शिंदे, निता धुमाळ,दत्तात्रय ताजणे, दत्तात्रय वाकचौरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी धुमाळ, उपमुख्याध्यापिका सुजल गात, पर्यवेक्षक मंगेश
खांबेकर, संजय शिंदे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्याने त्यांचेही अभिनंदन केले.