पारनेर च्या प्रसाद व प्रकाश यांनी मिळवले उत्तुंग यश

पारनेर पतसंस्था परिवाराने सत्कार करून दिल्या शुभेच्छा
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर मधील सख्या भावांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एन.डी.ए) एकाच वेळी, एकाच तुकडीत निवड होण्याची पहिलीच वेळ असावी, १९ वर्षीय प्रकाश गायकवाड व १७ वर्षीय प्रसाद गायकवाड या सख्या भावांनी मिळवलेले यश बाकी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, अभिमानास्पद असल्याचे सभापती दाते यांनी सांगितले.
भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत असणाऱ्या भास्कर गायकवाड रा. पारनेर जि. अहमदनगर यांचे हे दोन्ही मुले आहेत. एनडीएतील १४८ व्या तुकडीच्या निवडीसाठी कोरोणा संसर्ग काळात तणावपूर्ण वातावरणात प्रवेश परीक्षा झाली होती. सैन्य दलात कार्यरत असलेल्या वडिलांच्या सततच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पोस्टिंग मुळे प्रकाश व प्रसाद यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देशाच्या विविध राज्यात झाले प्रकाश व प्रसादचे प्राथमिक शिक्षण अंबाला (हरियाणा) पारनेर (महाराष्ट्र) ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे झाले. त्यानंतर प्रसाद ची सातारा येथील सैनिक स्कूल मध्ये निवड झाली. प्रकाशने मात्र सिलिगुडी (पश्चिम बंगाल) मथुरा (उत्तर प्रदेश) येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन वर्षांनी प्रांत अध्यापनाची पद्धत बदलत असूनही प्रकाश व प्रसाद ने प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली. बारावीनंतर प्रकाशने नांदेड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला मात्र अकरावीपासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळविण्याचा ध्यास घेतलेल्या प्रकाशने प्रवेश परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. तर प्रसादची सैनिक स्कूलमध्ये प्रवेश परीक्षेची तयारी सुरू होती प्रकाश व प्रसाद च्या मेहनतीला अखेर यश आले आणि दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी १४८ व्या तुकडीत निवड झाली.
: साडेपाच लाख विद्यार्थ्यांमधुन ४६२ विद्यार्थ्यांची निवड!
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेसाठी सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी ८ हजार विद्यार्थ्यांची मुलाखत व वैद्यकीय चाचणीसाठी निवड होते सर्विस सेलेक्शन बोर्ड कडून मुलाखती व वैद्यकीय तपासणी होऊन त्यातून केवळ ४६२ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी निवड झाली विपरीत परिस्थिती शिक्षण घेऊन देश पातळीवर होणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रकाश आणि प्रसाद ने हे यश मिळवले आहे.