अहमदनगरक्राईम

अहमदनगर औरंगाबाद रोडवर पोलीस व डिझेल चार यांचा सिनेस्टाईल थरार ! मुद्देमाला सह चार आरोपी जरबंद |

दत्तात्रय शिंदे

माका प्रतिनिधी

दिनांक 17.06.2022 रोजी पहाटे 04.30 वाजता पोनि करे. सोबत पोउपनि समाधान भाटेवाल, पोना बवन तमनर, पोको अंबादास गिते. पोको योगेश आव्हाड, पोकों/रामचंद्र वैद्य, पोकां/संदीप म्हस्के, पोको बाळासाहेब खंडकर असे सर्वांनी औरंगाबाद ते अहमदनगर रोडवर डिझेल चोर तसेच रोड रॉबरी करणारे चोरांना पकडण्यासाठी सापळा लावून औरंगाबाद ते अहमदनगर या महामार्गांवरुन फिरत असताना असताना, त्यावेळी एक
स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MP 13 CD I808 मधील चांघेजण त्रिमुर्ती कॉलेजचे विरुध्द बाजुस नेवासा
फाट्याकडे काही अंतरावर औरंगाबाद ते अहमदनगर मार्गावर वाहनात बिघाड झाल्याने रस्त्याचे बाजुस उभ
असलेला ट्रक क्रमांक MH 06 BD 1326 या ट्रकच डिझेलच्या टँकमधुन विरुध्द बाजुने पाईपच्या मदतीने डिझेल
निळ्या रंगाचे अंदाजे 35 लिटर आकाराच्या कॅन मध्ये काढत असताना दिसले असता त्या चौघांना रंगेहात
पकडण्यासाठी पोनि करे व सोबत असलेले पोना बबन तमनर, पाको यागेश आव्हाड गेले असता, स्विफ्ट डिझायर
कारचे चालकाने आगोदर सदरची कार काही अंतर वेगात ट्रकचे बाजुस माग घेऊन तितक्या बंगात पुढे घेतल्यान बाजुचे दरवाजास पकडण्याकरीता असलेले पोको आव्हाड, पोको गिते, हे जखमी झाले तर त्या गाड़ी समोर पोनि विजय करे यांचे अंगावर गाडी घातली असता, बानेटवरुन ते उड्डुन डाव्या बाजुस दोन्ही कारचे मध्यभागी डांबरीवर
पडले असता. सदर कारची डावी बाजु ही त्यांचे अंगाला घासुन पुढे निघून गेली. त्यानंतर पोलीसांनी सदर गाडीचा सिनेस्टाईलने पाठलाग सुरू केला. तेव्हा सदर स्विफ्ट डिझायर कार चालकाने त्यांचे कारची डिक्की उघडली व
डावे बाजुचा दरवाजा तुटलेला असताना सुध्दा त्याने अशा स्थितीत भरधाव वेगाने कुकाणा भंडाच दिशने
पळविली. सदरची स्विफ्ट गाडी पुढे व पोलीसांची गाडी ही काही अंतरावर पाठीमागे असे भेंडा कारखाना चौकात गेले असता. सदर कार चालकाने गाडी जागेवर वळवून पुन्हा नेवासा फाट्याच्या दिशेने घेतली व भानसहिवरागावात घालुन माळीचिंचोरा फाटाचे दिशेने वेगात पळविण्यांत आली त्यावरून लगेच पोनि करे यांनी LCB चे
सपोनि दिवटे यांचे सोबत संपर्क करुन त्यांचा सुध्दा सदरची गाडी पकडण्यासाठी बोलावून घेतले त्यानंतर सदर
स्विफ्ट गाडी चालकाने शनि शिंगणापुर रोडने गेला असता. त्यावेळी LCB चे सपोनि दिवटे व त्यांचे सोबत
असलेल्या पोलीस स्टाफने यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी LCB च्या पथकाला चकवा देवून
सदरची स्विफ्ट कार सोनई येथून घोडेगांव व त्यानंतर मिनाक्षी हॉटेल पासुन मारया चिचारे गावचे शिवारात बंगात

असताना त्यांनी त्यानंतर काहीसा वेग कामी करत स्विफ्ट चालकाने गाडीतून उडी मारुन रस्त्याचे बाजुस असलेलं
ऊसाचे शेतात पळाला तर डावे बाजुस असलेला ईसम हा गाडीतून खाली पडुन पळत असताना त्यांस पकडण्यात
पोनि करे व त्यांच्या पोलीस पथकाला यश आले व त्यानंतर त्याचेकडे विचारपुस करीत असता, त्याने त्याचे नांव चेनसिंग प्रेमसिंग ठाकुर, वय 28 वर्षे, रा.ता.जि. साझापुर ( मध्यप्रदेश) व त्याचे साथीदार स्विफ्ट कार चालका सहीत ईतर तीन साथीदारांची नावे 01) विकास मुलचंद कुशवाह, वय 35 वर्षे, रा. लक्ष्मीनगर साझापुर मध्यप्रदेश (चालक 1. (02) जांबाझ कसाब खान, वय 35 वर्षे, रा.धुपाडे तहसील साझापुर जि. साझापुर (मध्यप्रदेश ) 04) विकास मुलचंद कुशवाह याचा मित्र रा. साझापुर मध्यप्रदेश) अशी असल्याचे सांगितले नमुद तीन साथीदार
पळून जाण्यांत यशस्वी झाले परंतु डिझेल चार आरोपी चेनसिंग प्रेमसिंग टाकुर याला पकडुन त्याच्याकडु पोलीसांनी 35 लिटरचे 00 कॅन भरुन डिझेल तसेच एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार ताब्यांत घेऊन
त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून त्याचा पुढील तपास पोउपनि श्री. समाधान भाटेवाल हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील अहमदनगर, . अप्पर पोलीस अधीक्षक
स्वाती भोर श्रीरामपुर, . उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे उपविभाग शेवगांव यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री. विजय मा. करे पोलीस निरीक्षक श्री दिवटे, सपोनि स्थानिक गुन्हे शाखा. श्री. समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक श्री. मनोज मोंढ, पोलीस उप निरीक्षक, पोना बबन तमनर, पोको बाळासाहेब खेडकर, पोको संदीप
म्हस्के, पोकों / अंबादास गिते, पोकों / योगेश आव्हाड पोको / रामचंद्र वैद्य सर्व नेमणूक पोलीस ठाण नेवासा स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button