कोतुळ येथील केंद्रीय आश्रमशाळेचा दहावीचा १०० टक्के निकाल

कोतुळ प्रतिनिधी
कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कोतुळ संचलित कोतूळ येथील केंद्रीय निवासी अनुसूचित जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा विद्यालयाचा विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला
विद्यालयातील सर्व परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे
विद्यालयात दीपाली गोरे हिने 86 .20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळाला
दीक्षा सोनूले हिने 84 .80 टक्के गुण मिळून विद्यालयात दुसरा क्रमांक तर पायल कडाळे हिने 84% हे गुण मिळून तृतीय क्रमांक मिळाला
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब गीते ,सचिव सुमित गीते ,शिवाजीराव देशमुख संजय देशमुख, राजेंद्र देशमुख ,मीना गीते मुख्याध्यापिका सुप्रिया गीते आदींनी अभिनंदन केले आहे