अकोले तालुका एज्युकेशन च्या 10 पैकी 8 शाळांचा निकाल 100 टक्के
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या 10 माध्यमिक विद्यालयापैकी 8 विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला व उर्वरित दोन विद्यालयाचा 97 व 98 टक्के निकाल लागला असून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयांनी आपली गुणवत्ता सिद्ध केल्याने पालकांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीने ग्रामीण भागातील मुलामुलींची शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने अंभोळ ,मेहेंदूरी, शेंडी,चास,अकोले,कुंभेफळ, धामणगाव पाट, धामणगाव आवारी,ढोकरी येथे माध्यमिक विद्यालय सुरू केले व विठे येथील माध्यमिक विद्यालय नंतर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीला जोडले गेले.या विद्यालयामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आपली गुणवत्ता सिद्ध करू शकले, अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.
या विद्यालयामध्ये आम्लेश्वर विद्यालय अंभोळ ( 100 %), छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेहेंदूरी ( 100%), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी( 100%), भैरवनाथ विद्यालय ,चास( 100%),कन्या विद्या मंदिर अकोले(100%), शेषणारायण विद्यालय, कुंभेफळ (100%), संत ज्ञानेश्वर विद्यालय, ढोकरी (100%), ह.भ.प.सावित्राआई विद्यालय, विठे ( 100%), भारतरत्न राजीव गांधी विद्यालय, धामणगाव आवारी ( 98%),व सरस्वती विद्यालय, धामणगाव पाट ( 96.96%) व
या निकालाबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड,कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड,गिरजाजी जाधव, विश्वस्त सुरेशराव कोते, मधुकरराव सोनवणे, संपतराव वैद्य, अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, खजिनदार धनंजय संत,कार्यकारिणी सदस्य यशवंतराव आभाळे, ऍड.आनंदराव नवले, सुधाकरराव आरोटे,शरदराव देशमुख, सौ.कल्पनाताई सुरपुरीया, डॉ. डी. के.सहाणे,रमेशराव जगताप,मच्छीन्द्र धुमाळ, शिक्षणाधिकारी संपतराव
मालुंजकर,ग्रामस्थ,पालक यांनी अभिनंदन केले.