पानसवाडी येथील डी टी गडाख यांचे निधन.

सोनई (प्रतिनिधी):-
मुळा सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त वित्त व्यवस्थापक व मुळा एज्युकेशन संस्थेचे माजी सहसचिव दत्तात्रय त्रिंबक गडाख उर्फ डी टी गडाख रा. पानसवाडी ता.नेवासा यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी पुणे येथील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बुधवार दि.१३ जुलै, २०२२ रोजी रात्री 11 वा. निधन झाले.
गुरुवारी पानसवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. माजी खासदार व जेष्ट साहित्यिक यशवंतराव गडाख पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती.
स्व. गडाख यांना धार्मिक व सामाजिक कार्याची मनस्वी आवड होती. “नाथाचे घरची उलटी खूण” या त्यांची प्रमूख भूमिका असलेल्या। संत एकनाथ महाराजांच्या भारुडाचे जिल्हाभर अनेक कार्यक्रम संपन्न झाले.
पत्नी, एक मुलगा, पाच विवाहीत मुली, एक भाऊ, एक बहीण, चार पुतणे, सहा विवाहित पुतण्या, जावई, सुना, नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे.
ते सोनई सोसायटीचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब निमसे यांचे मेहुणे तर ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे व मुळा सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी बद्रीनाथ काळे यांचे सासरे होते.
त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.