डी टी एड कॉलेजच्या माजी विद्यार्थांचा स्नेहमेळावा संपन्न

१४ वर्षांनी पुन्हा एकत्र आले वर्गमित्र!
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :-
संजीवनी प्रतिष्ठानचे डी टी एड कॉलेज, कुरुंद मधील सन २०१०-११ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या शिक्षण संस्थेत भविष्याची गुरुकिल्ली व द्यानाची शिदोरी घेऊन गेल्यावर तब्बल १४ वर्षांनी पुन्हा एकत्र आली होती.
प्रथम राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्या नंतर एक एक विदयार्थी विचार मंचावर जाऊन स्वतःचा परिचय करुन देत होता.यावेळी शिक्षक, व्यावसायिक,, प्रगतिशील शेतकरी, आणि राजकीय क्षेत्रात. कार्यरत असलेले चेहरे फार वर्षांनी एकत्र आले होते.आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण व्यस्त असताना आपल्या जुन्या मित्र मैत्रीणीना आणि आदर्श गुरुजनाना पुन्हा भेटता येईल म्हणून आनंदाने उपास्थित होते. या वेळी प्रा. भुजबळ (सर), प्रा. वेताळ ( सर), प्रा. भोर (मॅडम,), प्रा. लंघे ( मॅडम), प्रा. फराटे ( मॅडम) या गुरुजनांचे माजी विद्यार्थ्यां कडून कॉलेजला व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
या कॉलेज मधील माजी विदयार्थी यानी सामजिक बांधिलकी जपत मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा,शिक्रापूर या संस्थेला मदतरुपी शालेय उपयोगी भेट वस्तू भेट दिल्या. वर्षातून एकदा तरी असे स्नेह संमेलन आयोजित करायचे आणि एकमेकांची भेट घ्यायची या वचनासह हि पाखरे पुन्हा आपापल्या गावी मार्गस्थ झाली.
यावेळी माजी विद्यार्थी पूनम सावंत, गणेश डुकरे, भगवान शेंडगे, सुनीता आढाव, अनिल पठारे, हौशिराम, वैभव घाटूळ, सारिका वेताळ, किरण गायकवाड, मिरा किसे, पूजा साळवे, सीमा वाखारे, समीर गायकवाड, मनीषा कोल्हे, अभिमन्यू रोहकले, संध्या शेळके, दिलीप कन्हेरकर, कांता घिगे, वैशाली जऱ्हाड, स्नेहा गाडे, कल्पना चोभे, मीना शिंदे, सुवर्णा दाते, अर्चना घोगरे, कोमल गायकवाड, सुषमा सातपुते, दिलीप कोकाटे, सविता मराडे, वैशाली मुरवदे, पूनम बार्शीले, नीलम अलभार, स्वाती आवारी, सतीश खोसे, किरण गावडे, मिलींद गडगे आदी उपस्थित होते.