जी एस महानगर को ऑपरेटीव्ह बँकेचा ३ शाखांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न .

दत्ता ठुबे
पारनेर – राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जी एस महानगर बँकेच्या पारनेर तालुक्यातील सुपा , पुणे येथील फुरसुंगी व साताऱ्यातील मलकापूर या ३ शाखांचे एटीएम सुविधेसहित मोठ्या उत्साहात उद्घाटन गुरुवार दि . २७ रोजी संपन्न झाले.
या ३ ही शाखांच्या उद्घाटनप्रसंगी बँकेच्या संचालक मंडळासहसहकार,राजकीय,शैक्षणिक,कृषी,सामाजिक,
पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होत्या. या ३ नवीन शाखांमुळे जी एस महानगर बँकेच्या शाखांची संख्या ७० झाली आहे.बँकेने ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त केला असून गत २०२३ व २४ या आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा ३० कोटी रुपये होता तर त्याच बरोबर शेकडा शून्य टक्के नेट एनपीएचे उद्दिष्ट साध्य करण्यात बँक यशस्वी झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या सर्व आर्थिक निकषांची बँकेने पुर्तता केल्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम व सुव्यवस्थित बँकेचा दर्जा प्राप्त झाला आहे. सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीमध्ये सहकारी बँकांची भूमिका खूप मोलाची आहे व नजीकच्या भविष्यात बँकेच्या ग्राहकांना उत्तमोत्तम आणि अदयावत सेवा प्रदान करून ५ हजार कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा पार पाडण्याचा बँकेचा मानस आहे,असा विश्वास बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला.आतापर्यंतची बँकेची प्रगती ही बँकेच्या सर्व भागधारक,ग्राहक, हितचिंतक आणि कर्मचारी वर्ग यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच शक्य झाले आहे असे अध्यक्षा शेळके म्हणाल्या.