इतर

आ.रोहीत पवार यांनी आणलेल्या गंगाजलाने पारनेरचे ग्रामदैवत नागेश्वरचा अभिषेक !

पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या हस्ते झाले गंगापूजन !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी


पराशर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारनेर शहरात बारा ज्योतिर्लिंग वास करतात अशी आख्यायिका आहे . व बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिरही पारनेर शहरात आहेत . पारनेर शहराच्या या पावन भूमीत आमदार रोहित पवार यांनी आणलेल्या गंगा जलाचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी स्वागत केले व पारनेरचे ग्रामदैवत असणाऱ्या नागेश्वर मंदिरात पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री . विजय औटी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन शेठ भालेकर यांच्यासह नगरसेवक अशोक चेडे ,योगेश मते , डॉक्टर सचिन औटी , श्रीकांत चौरे , भूषण शेलार , बाळासाहेब नगरे ,विजय भास्कर औटी , डॉ . कावरे , नितिन अडसुळ , सुभाष शिंदे , विजय डोळ , बाबासाहेब पठारे ,बंडू गायकवाड अक्षय चेडे , बाळू पुजारी , शिरीष शेटीया , रायभान औटी व पारनेरचे ग्रामदैवत नागेश्वराचे पुजारी योगेश वाघ यांच्या हस्ते गंगाजलाचे पूजन करत श्री.नागेश्वराचा अभिषेक करण्यात आला .व हे गंगाजल घेऊन येणाऱ्या आमदार रोहित पवार यांचे सहकारी मित्रांचेही सर्व नगरसेवकांनी पारनेर शहराच्या वतीने सत्कार केला .
आपल्या धर्मात अध्यात्माला आणि तिर्थयात्रेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.आमदार रोहित पवार यांना लहानपणापासून तिर्थाटनाची आवड असून काही दिवसांपूर्वीच कुटुंबासह विविध राज्यातील अनेक अध्यात्मिक व धार्मिक स्थळांची यात्रा करुन त्यांनी दर्शन घेतलं आहे. या वेळी पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला त्या वाराणशीच्या श्री विश्वेश्वराचीही पूजा-अभिषेक करुन आ . पवार यांनी गंगाआरती केली होती.
गंगाआरती करत असताना, “मतदारसंघातील आणि राज्यातील प्रमुख धार्मिक व अध्यात्मिक स्थळांच्या ठिकाणीही या गंगाजलाने अभिषेक करता आला तर किती बरं होईल….?” असा विचार क्षणभर त्यांच्या मनात आला आणि तो कृतीत आणण्यासाठी तेथून गंगाजल घेऊन आले.या गंगाजलाचे शेकडो कलश तयार केले असून ते राज्यातील प्रमुख धार्मिक व अध्यात्मिक तिर्थस्थळी पाठवण्यात आले आहेत.
पारनेर शहरात मोठ्या प्रमाणात धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजिक कार्य केलं जात असल्याने पारनेर येथील नागेश्वर मंदिरात पाठवलेल्या या गंगाजलाचा स्वीकार करत पारनेर नगर पंचायतचे अध्यक्ष , उपाध्यक्ष नगरसेवक व पारनेर शहरातील अनेक मान्यवर भावी भक्तांचे हाताने पारनेरचे ग्रामदैवत असणार्‍या नागेश्वराची विधीवत पूजा करत गंगा पूजन करण्यात आले .
आमदार रोहित पवार यांनी धार्मिक अस्मिता जतन करत संपूर्ण राज्यभर राबवलेल्या गंगापूजन सोहळ्यास सर्व शिवप्रेमी भाविक भक्तांनी शेकडो धार्मिक ठिकाणी जात हे गंगापूजन भोलेशिव शंभूचा अभिषेक करण्यात यावा व राज्याच्या व देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी,अशा प्रकारचा संदेशही कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्राद्वारे दिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button