माका येथे गुरुदेव कॉम्प्युटर्स व श्री गुरू क्लासेस च्या वतीने गुणवंतांचा सत्कार !

माका प्रतिनिधी
माका येथील गुरुदेव कॉम्प्युटर्स व श्री गुरु क्लासेस आयोजित SSC व HSC बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर करियर विषयी येणाऱ्या अडचणी यावर मार्गदर्शनपर गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माका गावचे ज्येष्ठ पत्रकार श्री शिवाजी भाऊ पालवे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले आणि गेस्ट लेक्चरर म्हणून लाभलेले श्री अनिकेत क्षिरसागर (ग्राफिक डिझायनर AdBanao अहमदनगर) यांनी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर क्षेत्रातील संधी व करिअर मार्गदर्शन पर माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मारुती भुजबळ सर यांनी केले तर या कार्यक्रमासाठी सहकारी मित्र विनोद कोकाटे, भाऊसाहेब कानडे, संदीप रूपनर हेही उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचा समारोप व पाहुण्यांचे आभार नरेंद्र बोंद्रे यांनी मानले.