व्ही.पी.एस मध्ये संविधान दिन साजरा

शिर्डी प्रतिनिधी :
(संजय महाजन )
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, ज्येष्ठ शिक्षक श्री. चंद्रकांत जोशी, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अनुजा गोसावी, श्री. अनिल खामकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख कलाशिक्षक श्री. योगेश कोठावदे यांनी तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढुमणे यांनी केले. विद्यार्थ्यांना संविधानाविषयी सखोल माहिती जेष्ठ शिक्षक श्री. अनिल खामकर यांनी सांगितली. त्याचबरोबर दहावी अ मधील विद्यार्थिनी कु. अदिती कदम आणि सातवी ब मधील कु. दिव्या चव्हाण या विद्यार्थिनींनी आपली मनोगते सादर केली.
विद्यार्थ्यांसमोर श्री. योगेश कोठावदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले तसेच शिक्षक, सेवक, उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या पाठोपाठ प्रास्ताविकेचे वाचन केले.
कार्यक्रमासाठी श्री. संजय पालवे, श्री. वैभव सूर्यवंशी, श्री. जयवंत सिसोदे आणि शिक्षक वृंद व सेवक वर्ग यांचे सहकार्य लाभले तसेच श्रीमती ज्योती डामसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.