ग्रामीणमहाराष्ट्र

सारंग कामतेकर म्हणाले…स्थानिक स्वराज्य संस्था जगल्या पाहिजे यासाठी काम करणे गरजेचे

चांगला लोकप्रतिनिधी निवडण्याचे काम जनतेचे

सार्वभौम लोकशाहीत जनता हा केंद्रबिंदू -डॉ शशिकांत मंगरूळे

संगमनेर प्रतिनिधी

चांगला लोकप्रतिनिधी निवडण्याचे काम जनतेचे आहे
वार्डात कामे होत नाही अशी मनाशी खंत बाळगण्यापेक्षा लोकप्रतिनिधी निवडून देत असताना लोकांनी चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्राधान्यक्रमाने पुढे आले पाहिजे. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व स्थानिक स्वराज्य संस्थेचे अभ्यासक सारंग कामतेकर यांनी केले

ते पुढे म्हणाले की लोकप्रतिनिधी हा पत्रकारांना घाबरणारा असतो न्यूज मेकर माध्यमे लोकांना आवडतात कोणत्या विषयावर सभा गाजली याबाबत वृत्तांकन प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. वार्डातील अविकसित कामाविषयी प्रतिनिधींना प्रश्न करणारे पत्रकार असले पाहिजे.लोकांनी लोक प्रतिनिधींवर अंकुश ठेवावासभागृहातील अधिकार नियम कायदे याची अंमलबजावणी झाली पाहिजे सभागृहातील ज्ञान नसल्यामुळे लोकशाही डबघाईला आली

योजना आणि निधीचा वापर यथायोग्य परिपूर्ण झालाच पाहिजे सभागृहात बजेट वाचन होणे गरजेचे आहे स्थानिक स्वराज्य संस्था जगल्या पाहिजे यासाठी काम करणे गरजेचे आहे

शहरे वाढली त्याचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. स्त्रोत डेव्हलपमेंट वाढवण्यासाठी रिकव्हरी वाढवा. जे देत नाही त्यांच्याकडे जा, विकास कामे यातूनच होणार आहे. वसुलीच्या बाबतीत 43 टक्के वसूली होते तर 53 टक्के वसुली होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सेवाभावी संस्थेचा खर्च निघणे अपेक्षित आहे. विकासासाठी निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे. अभ्यास दौऱ्यात अभ्यास होतो का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निधी कुठून येतो? याबाबत नागरिकांनी ज्ञात करून घेणे गरजेचे आहे. एक टाचनीचा वापर केल्यास सभागृहात मांडणे क्रमप्राप्त आहे. याबाबत नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधी ने ग्रामसभेच्या माध्यमातून जागृत राहणे गरजेचे आहे. आपल्या परिसराला आणि शहराला काय देणार. माझ्या पाठपुराव्यामुळे विकास झाला हा अभिमान सांगता आला पाहिजे. कचरा या विषयावर अब्जावधी निधी उपलब्ध आहे. कचऱ्याबाबत नागरिक उदासीन आहे. 99 टक्के निधी चा वापर झाला की प्रशासनाला यश मिळते. केंद्रशासन राज्यशासन आणि स्थानिक संस्थांच्या माध्यमातून अनेक योजना आणि निधी येत असतो परंतु कोणती योजना केंद्राची ,कोणती योजना राज्याची, हा संभ्रम जनतेत असून योजना ह्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती, महिला, अपंग ही योजना कोणती आहे आणि त्या लोकांपर्यंत पोहोचतात की नाही ? योजना राबवली गेली की नाही यासाठी नागरिकांनी सजग राहिले पाहिजे ती माहिती जाणून घेतली पाहिजे. आंधळा विकास नको, विकास हा शाश्वत आणि तंत्रशुद्ध असावा विकास आराखड्याची अंमलबजावणी विचारमंथनातून झाली पाहिजे असेही ते म्हणाले. लोकप्रतिनिधी यांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी आता जनतेने पुढे आले पाहिजे. कारण देश लोकशाही पद्धतीने देश पुढे जात आहे चांगल्या विचारांची लोकशाही देशात आहे असे सारंग कामतेकर यांनी यावेळी सांगितले.

नगरविकास खाते कोणाकडे आहे. ? प्लेग्राउंड, भूखंड संपादन कायदा, वॉर्डांत विकास होत नाही ! स्वार्थ बाजूला ठेवून धोरणात्मक कामाची आणि विकासाची अंमलबजावणी झाली पाहिजे. सभेचे कामकाज अजेडा, एकत्र प्रश्न, विचारले जात नाही ही शोकांतिका आहे . चुकीचे चालले तरी आवाज उठवू शकत नाही. कायद्याच्या चौकटीतील प्रश्नाची नियमावली वाचली पाहिजे स्थगन प्रस्ताव चुकीच्या प्रश्नावर बोलले पाहिजे धोरण माहितीचा अधिकार सभागृहातील कामे सभावृत्तांत सभा कशी चालते कोणकोणते विषय कसे म्हणतात विचार मंथन होणे गरजेचे आहे कारण विरोधकांना विषय चांगली माहीत असतात केवळ मलमपट्टीने विकास होत नसून शाश्‍वत विकासापासून आपण कोसो दूर राहतो पाणी देणे जर असते याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे म्हणाले की सार्वभौम लोकशाहीत जनता हेच केंद्रबिंदू आहे. येत्या दोन-तीन महिन्यात निवडणुका होणार आहे. लोकाभिमुख, लोकोपयोगी समस्यांवर विचारमंथन होणार असून या विचारातून लोकशाही प्रबळ होईल. भारत एकीकडे अमृत महोत्सव साजरा करीत आहे. जगात सर्वात मोठी लोकशाही भारताची असून ती चांगली रुजली आहे. सार्वभौम लोकशाहीत जनता हेच केंद्रबिंदू आहे भारताने लिखित राज्यघटनेने पाच गुण अंगीकारलेले आहे. अब्राहम लिंकन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी त्यांच्याबाबत विचार व्यक्त करून नैतिक आणि बौद्धिकतेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची सुलभतेने उकल करून मूलभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे असल्याचे डॉ.मंगरुळे म्हणाले,

मंच चे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने म्हणाले की,
संगमनेर पत्रकार मंचने पत्रकारांसाठी, समाजासाठी अनेक उपक्रम, शिबिर, समस्या निराकरण आदी करण्यासाठी तद्वतच पत्रकारांवर होणारे हल्ले यावर वाचा फोडण्यासाठी आणि महानगर, ग्रामीण पत्रकारितेतील अडचणी कोरोणा काळात आलेल्या संकटाचा सामना पत्रकारांना करावा लागला व काही पत्रकारांना मृत्युलाही सामोरे जावे लागले यासाठी विमा आणि रुग्णालय सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो कोरोणा काळात वृत्तपत्र आणि चॅनेलच्या माध्यमातून समाजाची भीती दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही केले. पत्रकार मंच ने उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रशासना सोबत सुसंवाद, समन्वय ठेवून पत्रकारांमध्ये एकजूट,एक विचार, समाजहित पाण्यासाठी संगमनेर पत्रकार मंचची मुहूर्तमेढ रोवली. मीडिया मध्ये झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेत भविष्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम व्याख्यान याचा प्रबंध करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

अतिथी मान्यवरांचा परिचय करून देताना नितीन ओझा म्हणाले की राजकारण आणि समाजकारणाचा
शोध घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. समाजाचे देणे लागतो या हेतूने समाजाचे प्रबोधन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

पाहुण्यांचे स्वागत मंगेश सालपे, सतीश आहेर यांनी केले. परिचय नितीन ओझा यांनी, प्रास्ताविक मंचचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने तर सूत्रसंचालन संदीप वाकचौरे तर आभार संजय अहिरे यांनी व्यक्त केले.

यावेळी राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व पक्षीय कार्यकर्त्या बरोबरच प्राध्यापक विद्यार्थी वृंदही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button