
ना.अजित दादांच्या उपस्थितीत
वाकचौरे, मनकर यांचा
राष्ट्रवादीत प्रवेश!
अकोल्यात कमळाच्या पाकळ्या गळू लागल्या!
सुनील गीते
अकोले दि २१
माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांचे खंदे समर्थक व विश्वासू सहकारी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे व अकोल्यातील भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते वकील वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी चे घडयाळ हातात बांधले
कैलास वाकचौरे आणि वसंत मनकर यांनी आज भाजपाला बाय बाय करत पिचड यांना राजकीय धक्का दिला आहे चार दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे वाढदिवसा अभिष्टचिंतन साठी अकोल्यात येऊन गेले या दिवशी ते अकोल्या साठी काहीतरी मोठीं घोषणा करतील अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली त्यांनी कोणतेही ठोस कामाची घोषणा केली नाही केवळ पिचड यांचे कारखान्याच्या निवडणुकीसाठी चे मार्केटिंग केले पिचड हेच कसे अगस्ती कारखान्या साठी योग्य आहे हेच सांगितले कोणत्याही मोठ्या विकास कामाची घोषणा केली नाही

या कार्यक्रमांतर चारच दिवसात आज मंगळवारी मुंबईत कैलास वाकचौरे आणि वसंत मनकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सकाळी ९ वाजता मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्य मंत्री ना. प्राजक्त तनपुरे ,राजेंद्र फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला
यावेळी आमदर डॉ. किरण लहामटे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सिताराम पा.पाटील गायकर, जि.प. माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे या सह अकोल्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
अकोले नगरपंचायत निवडणुकीत कैलास वाकचौरे आणि वसंत मनकर यांनी पिचड पिता पुत्र यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका बजावत अकोले नगरपंचायत वर भाजपा चा झेंडा फडकविला त्यानंतर नगरपंचायत मध्ये पदाधिकारी निवडीवरून पिचड यांच्याशी मतभेद झाले तेव्हापासून पिचड पिता पुत्रांवर हे नाराज होते या नाराजीतून त्यांनी आज पिचड यांचे नेतृत्वाला व भाजप पक्षाला सोडचिट्ठी दिली गेल्या काही दिवसापासून त्यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या
सोमवारी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा उमेदवारी अर्ज प्रक्रियेमध्ये कैलास वाकचौरे यांनी थेट उडी घेत राष्ट्रवादी पक्ष कडून कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाला पुष्टी मिळाली आणि आज मंगळवारी त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला वाकचौरे मनकर यांनी भाजपाला राम राम ठोकल्याने ऐनअगस्ती कारखाना निवडणुकीत अकोल्यात राजकीय ऊलथापालथ सुरू झाली आहे यामुळे अगस्ती च्या निवडणूकीची रंगत आता वाढणार आहे
