वाडेगव्हान सेवा संस्थेवर सभापती गणेश शेळके गटाचे वर्चस्व..

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
पंचायत समिती माध्यमातून वाडेगव्हान गटात केलेली विविध विकासकामे पाहुन जनतेने सेवा संस्थेस आपल्या गटाला प्राधान्य दिले.जनतेच्या या पाठिंब्यामुळे पुढे काम करण्यास वाव मिळतो सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील आसे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी केले.
वाडेगव्हान(ता.पारनेर) येथील सेवा संस्था निवडणुकीत आठ जागा मिळवत माजी सभापती गणेश शेळके गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले त्यावेळी पार पडलेल्या बैठकीत शेळके बोलत होते.
तुकाई माता क्रांती विकास पॅनलचे नेतृत्व
सरपंच बाळासाहेब सोनवणे,युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके,मा.सरपंच जयसिंग धोत्रे,मा.सरपंच संतोष शेळके,मावळेवाडी चे सरपंच उदय कुरकुटे, उपसरपंच गणेश पठारे,यादववाडी चे मा.सरपंच अरविंद यादव,मा.उपसरपंच प्रियांका यादव ,नवनाथ शेळके,उद्धव शेळके,रवी शेळके यांनी केले.
सर्वाधिक मताने रामचंद्र शेळके याना 1 क्रमांकाची मते मिळाली तुकाई माता क्रांती विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
रामचंद शेळके,संभाजी वारे,संजय खंदारे,प्रशांत शेळके,राजेंद्र शेळके,संतोष रासकर,गोपाळ धोत्रे
चंद्रकांत सोनवणे हे आहेत.
विरोधी जगदंबा विकास पॅनल चे नेतृत्व प्रमोद घनवट विजय खंदारे किशोर यादव जालिंदर तानावडे यांनी केले तर विरोधी गटाला ५ जागा मिळाल्या
प्रमोद घनवट,विजय खंदारे,जालिंदर तानावाडे, मनीषा शेळके,मीरा गवळी हे उमेदवार विजयी झाले.