पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी विदयालयाचा दहावी चा निकाल १०० %

अकोले/प्रतिनिधी –
लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार दयावा तशी मुर्ती घडते. या उक्तीप्रमाणे अकोले तालुक्यातील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा या विद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंदांनी ज्ञानदान केले
मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेऊन परीक्षेचा निकाल १००% लागला आहे. त्यामुळे सर्वत्र मार्गदर्शक शिक्षक तसेच यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक होत आहे.
या परीक्षेत कुमारी पथवे सचित्रा रमेश व सोंगाळ पुष्पा संतोष या विद्यार्थिनींनी समान 87.00 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या असून
कुमारी मधे प्रियांका बाळू व कुमारी लगड सानिका नवनाथ या विद्यार्थिनींनी 84.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला तर कुमारी बोऱ्हाडे श्रद्धा राम हिने 83 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
तर जाधव पूनम सुखदेव हिने 82.40 टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
कुमारी घुले प्रतीक्षा सुनील व कुमारी कोकणे हर्षदा नवनाथ या विद्यार्थिनींनी समान
82 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला आहे.या गुणवंत विदयार्थ्यांना विदयालयाचे प्राचार्य सुनिल धुमाळ, विजय भालेराव,रामदास कासार,अनिल चासकर,मारूती आभाळे, विठ्ठल आभाळे,अण्णासाहेब ढगे, तुकाराम भोर,संकेत यलमामे,महेश खांडरे आदी शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर,मंगेश नवले,सर्व पदाधिकारी, माजी उपसभापती मारूती मेंगाळ,ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन आढळ,उपसरपंच सुनिता बगनर,सर्व सदस्य, पोलीस पाटील चंद्रकांत लगड, मारूती काळे,बबनराव आभाळे,जालिंदर धुमाळ, नामदेव लगड,सुभाष बगनर,वाळीबा लगड,मारूती आभाळे,नवनाथ लगड ,देवचंद काळे,राम लगड,रमेश धोंगडे,भाऊसाहेब लगड, सदाशिव आढळ, डॉ.विजय काळे,रोहिदास लगड,रमेश मेंगाळ, सतिष आभाळे,संतोष लगड, भास्कर बगनर यांसह सर्व ग्रामस्थ, पालक आदींनी अभिनंदन केले