संगमनेरात आंदोलन कर्त्या छात्र भारती च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

संगमनेर प्रतिनिधी
. छात्रभारती चा अग्निपथ योजना रद्द करावी या मागणीसाठी छात्रभारती च्या वतीने संगमनेरात शासकीय विश्रामगृह ते प्रांत कार्यलय मोर्चा होणार होता , पोलिसांनी या मोर्चा ला परवानगी नाकारली व छात्रभारती संघटनेच्या पदाधिकारी व सर्व अकॅडमी चालकांना नोटिसा देऊन तुम्ही आंदोलनात सामील झाले तर तुमच्या वर गुन्हे दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले .अशी दडपशाही असताना ही छात्रभारती च्या विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहून संगमनेर बस स्थानक समोर निदर्शने करून पुणे नाशिक हायवे वर बसून घोषणाबाजी केली .पोलिसांनी विद्यार्थ्यांना ओढून ताणून ताब्यात घेतले .व आंदोलन मोडकळीस आणले .
केंद्र सरकारने लागू केलेली योजना मुलांचे भविष्य उधवस्थ करणारी आहे .पेंशन बंद करायच्या असतील तर आमदार खासदार मंत्री यांच्या बंद करा. सरकारी नोकऱ्याचे खाजगीकरण करून पेंशन बंद करायचा डाव केंद्र सरकार आखत आहे .जो पर्यंत ती योजना रद्द करत नाही तो पर्यंत छात्रभारती च्या वतीने आंदोलन करण्यात येईल .
आंदोलनात छात्रभारती चे राज्य संघटक अनिकेत घुले , माजी अध्यक्ष दत्ता ढगे , गणेश जोंधळे ,राहुल जऱ्हाड ,विशाल शिंदे ,पंकज पडवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते .छात्रभारतीचे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दडपशाही करून पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले