घरकुल बांधण्यासाठी सिमेंट ब्लॉक घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला फोफसंडीत अपघात!

अकोले प्रतिनिधी
घरकुल बांधण्यासाठी सिमेंट ब्लॉक विटा घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहना चा फोफसंडी ता.अकोले येथे अपघात झाला
वाहनातून विटा घेऊन जातं असताना कोंडारवाडी(फोफसंडी) रस्त्यावर हा अपघात झाला आहे रस्ता खराब असल्या कारणाने पिकअप चा अपघात झाला आहे, सुदैवाने ड्रायवर ला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही, नाव रवी मुठे आहे . या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता खराब असल्या कारणाने अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत.

फोफसंडी गावची कोंडारवाडी या वाडीमध्ये वीस पंचवीस कुटूंब आहेत, जिल्हा परिषद ची शाळा आहे, या खराब रस्त्याच्या कारणांमुळे विद्यार्थ्यांना येणे जाण्यासाठी अनेक अडथळे येतात, बिबट्यांची अतिशय दहशत या ठिकाणी आहे, पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शेतमाल मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडथळे पार करावे लागतात. या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली आहे. हा रस्ता मंजूर असूनही डांबरीकरणाला अध्याप ठेकेदार इकडे फिरकत नाही असा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.
कोंडार वाडी हा रस्ता डांबरीकरण व्हावा,यासाठी के ए ग्रुप अकोले संघटनेचे राहुल वळे .हा रस्ता शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी केली आहे



