नारायणगव्हाण चौपदरी करणासाठी नव्याने भूसंपादनाचा प्रस्ताव

सुधारीत प्रस्तावासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरवा सुरू~ शरद पवळे.
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण चौपद्रिकरणाचे काम काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहील्यामुळे गावातील शाळकरी विदयार्थी,अबाल वृद्ध, गावकऱ्यां बरोबरच प्रवाशांनाही मोठा धोका पत्करून प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्यामाठी ग्रामस्थ सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत निवेदन,उपोषण,रास्ता रोको, टोलबंद आंदोलन अशा विविध मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम आंदोलनकर्ते, ग्रामस्थांकडून करण्यात आले प्रशासनाने मागिल आंदोलनाच्या वेळी अर्धवट रस्त्याचे काम गावांपर्यंत करत सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले परंतु उर्वरित रस्ताचा प्रश्न प्रलंबितच राहीला त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पुन्हा नव्याने प्रशासनाकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसह अपुर्ण रस्त्यामुळे गावाची थांबलेली प्रगती यासाठी पाठपुरावा सुरु केला असून याची दखल घेत प्रशासनाने तातडीने रस्त्यावरच्या सुरक्षिततेच्या कामांसोबतच नारायणगहाण चौपद्रिकरणाच्या भुसंपादनाचा नव्याने सुधारीत प्रस्ताव बनवण्यासाठी रस्त्यालगतच्या मिळकतींचे उतारे जमा करण्याचे पत्र ग्रामसेवक तलाठी यांना देण्यात आले आहे याकामी रस्त्याबरोबरच पुढील भुसंपादनाचा योग्य मोबदला जागा मालकांना मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले.