इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि .१२/०३/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २२ शके १९४५
दिनांक :- १२/०३/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३७,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति ०७:१४, तृतीया २८:०४,
नक्षत्र :- रेवती समाप्ति २०:३०,
योग :- शुक्ल समाप्ति ०७:५३, ब्रह्मा २८:०८,
करण :- तैतिल समाप्ति १७:३६,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – पू.भा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथि वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:-

राहूकाळ:- दुपारी ०३:३८ ते ०५:०८ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ११:०९ ते १२:३९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३९ ते ०२:०८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
अमृत २०:३० नं., मु. रमजान मासारंभ,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २२ शके १९४५
दिनांक = १२/०३/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. झोपेची तक्रार जाणवेल. तरुण वर्गात अधिक वेळ घालवाल.

वृषभ
व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. व्यावहारिक कल्पकता वापराल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल. काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल. अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल.

मिथुन
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. चांगली संगत लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

कर्क
मानसिक ताणापासून दूर राहावे. घरातील वडीलधार्‍या व्यक्तींचे मत विरोधी वाटू शकते. अंगीभूत कलागुण विकसित होण्यास वाव द्यावा. अति विचार करणे टाळावे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.

सिंह
जोडीदाराशी विचार-विनिमय कराल. भागीदारीत नवीन योजना आमलात आणाल. मुलांच्या हट्टीपणा कडे लक्ष ठेवा. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कन्या
पत्नीची प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. जुगारातून लाभ संभवतो. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल.

तूळ
पत्नीचा वरचष्मा राहील. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळचा प्रवास जपून करावा. कामाचा जोम वाढेल.

वृश्चिक
बोलतांना सारासार विचार करून बोलावे. कसलाही उतावीळपणा करायला जाऊ नये. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. घरात नातेवाईक जमा होतील. दिवस हसत-खेळत घालवाल.

धनू
रागाचा पारा आवरता घ्यावा लागेल. आततायीपणे वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे.

मकर
सामुदायिक गोष्टीपासून दूर राहावे. स्त्रीवर्गापासून सावधानता बाळगावी. धार्मिक यात्रा कराल. प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. वादविवादात सामील होणे टाळा.

कुंभ
मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. हातातील कला जोपासावी.

मीन
वेळेचे महत्व जाणून वागावे. कोणालाही शब्द देतांना विचार करावा. व्यावसायिक लाभाचे योग्य नियोजन करावे. चटपटीत पदार्थ खाल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोला
पूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button