पोपटराव आवटे यांना वरिष्ठ हिंदी साहित्यकार पुरस्कार प्राप्त

शहाराम सगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
-राष्ट्रिय साहित्य सेवा संस्था पुणे यांच्या मार्फत पुणे कॉलेज पुणे येथील हिंदी विभाग यांच्या सौजन्याने पुणाकॉलेज येथील सभागृहात भातकुडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भातकुडगाव तालुका शेवगाव मधील हिंदी विषयाचे प्राध्यापक श्री पोपटराव हरिश्चंद्र आवटे यांना नुकताच वरिष्ठ हिंदी साहित्यकार पुरस्कार राष्ट्रीय साहित्य सेवा संस्था पुणे येथील महाराष्ट्राचे जयलाल संस्थापक श्री हजारीलाल कटरे व श्रीमती दीपिका कटरे पूना कॉलेज प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर आफ्ताब अन्वर शेख हिंदी विभाग अध्यक्ष डॉक्टर शाकीर शेख विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान प्रयाग्रज उत्तर प्रदेश चे अध्यक्ष डॉक्टर शहाबुद्दीन शेख सर श्रीमती इंदिरा शबनम पूनावाला ज्येष्ठ कवयित्री यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले
यावेळी पुन्हा कॉलेजमध्ये अखिल भारतीय कवि सम्मेलन व साहित्यिक पुरस्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले याठिकाणी आज का आनंद समाचार पत्रा चे संस्थापक श्री आनंद अग्रवाल मध्यप्रदेश फिल्म अभिनेता आणि कवी श्री हरीश पांडे मध्यप्रदेश श्रीमती कविता राजपूत मुंबई श्रीमती अर्चना पानसरे पुना या सर्वांच्या उपस्थितीत कवी आणि कवयित्री यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले प्राध्यापक पोपटराव आवटे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्रजी घुले पाटील माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील सचिव जिल्हा परिषद अहमदनगर अध्यक्ष राजश्रीताई घुले पंचायत समिती शेवगाव चे सभापती डॉक्टर क्षितिज भैया घुले प्रशासकीय अधिकारी श्री कारभारी नजन विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती नरवडे मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले