गेवराई सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष कर्डीले, व्हा.चेअरमन सौ.शशिकला पाटेकर यांची निवड

सोनई–( विजय खंडागळे)-
मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील गेवराई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष शिवराम कर्डीले तर व्हा.चेअरमन पदी सौ.शशिकला धोंडीराम पाटेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी श्री.जी.एम.नागरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पंडित भाऊसाहेब यांनी काम पाहिले.
चेअरमन पदाची सूचना प्रतीक गोरे तर त्यास अनुमोदन भागचंद कर्डीले यांनी दिले.व्हा.चेअरमन पदाची सूचना सागर जगताप यांनी मांडली तर अनुमोदन बाळासाहेब आदमाने यांनी दिले.कार्यकर्ते अनिल कर्डीले यांनी सूत्रसंचालन तर आभार शिक्षक वसंत कर्डीले यांनी मानले.
या निवडीवेळी कपूरचंद कर्डीले, भाऊसाहेब लोणकर, ज्ञानेश्वर कर्डीले, दिलीप आदमाणे, शंकरराव खाटीक,शिवाजी पाटेकर,गोरक्षनाथ जगताप,शिवाजी सतरकर, गोरक्षनाथ लोणकर, विक्रम टेकाळे,आप्पासाहेब गोरे,बबन काळे,बबन पाटेकर, सोमनाथ पाटेकर, रेवणनाथ पाटेकर, काकासाहेब कर्डीले, बापुसाहेब गोरे,सोपान कर्डीले, पोलीस पाटील संभाजी कर्डीले, शिवाजी कर्डीले, शिवाजी झाडे,संभाजी जगताप,महेश कर्डीले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन पदाधिकारी यांचे राज्याचे मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे.