पारनेर साखर कारखान्याचा निर्माण झालेला प्रश्न सोडवणार : शरद पवार

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
: देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याचा सध्या निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी मी वैयक्तीक प्रयत्न करीन असे आश्वासन निघोज येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
पारनेर कारखाना बचाव व पुर्नजीवन समितीने पारनेरच्या सोळा हजार सभासदांच्या वतीने केलेली मागणी माझ्याकडे प्राप्त झालेली आहे . त्यामध्ये त्यांनी राज्य सरकार कडेही काही मागण्या केल्या आहेत त्या पुर्ण होत नाहीत असे म्हटले आहे . त्यासाठीही माझ्याकडून प्रयत्न केला जाईल तसेच येत्या राज्यसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न सोडवण्यासाठी मी वैयक्तीक लक्ष घालीन.तुमचे पारनेरचे आमदार निलेश लंके व मी यासाठी एकत्रीत प्रयत्न करीन असेही पवार म्हणाले. निघोज येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते .
पारनेर सहकारी साखर कारखाना खाजगीकरणामागे पवारांचा हात असल्याचा मुद्दा उपस्थित करून पारनेर कारखाना बचाव व पुर्नजीवन बचाव समितीने
पवार गो – बॅक आंदालनाचा इशारा दिला होता . त्या पार्श्वभुमीवर पवार या आंदोलनाला उत्तर देतील अशी अपेक्षा होती . त्यांचा हा दौरा पारनेर साखर कारखाना परीसरात होता त्यामुळे बचाव समितीकडून हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला होता .
हा प्रश्न पवारांनी सोडवल्यास आंदोलन करणारी बचाव समिती पवारांचे स्वागत करील अशी प्रतिक्रिया बचाव समितीने दिली .