शाळेतील सुविचार फलकावर रोज एक अंभग लिहून विद्यार्थांना अध्यात्माचे ज्ञान द्यावे -निवृत्ती महाराज देशमुख

दत्तात्रय शिंदे_
माका प्रतिनिधी
नेवाशात ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहली असल्याने ,यासंबंधी जागतीक महत्व प्राप्त झाले असुन सर्व ग्रंथाचे सार हे हरीपाठात आहे . नेवासा ,तालुका ज्ञानेश्वर माऊलींच्या तसेच संत किसनगिरी बाबा,भास्करगीरी बाबा,प्रशांतनंद किशोरजी बाबा यांच्या कृपाआशीर्वादाने,व पदस्पर्शाने सुखदायी झाला असल्याचे ही त्यांनी सांगितले.
कोरोनाकाळात शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अभ्यासक्रमाने विद्यार्थी व शिक्षक यात समन्वय राहिला नाही ,शिक्षण विषयक धोरण अवलंबून या बरोबर
अध्याध्यात्मिक शिक्षणा साठी शिक्षकांनी शाळेतील सुविचार फलकावर रोज हरीपाठातील एक अंभग लिहून विद्यार्थांना अध्यात्माचे ज्ञान दिले पाहिजे गावातील तंटे तंटामुक्तीच्याआधारे गावातच मिटवणं गरजेचे असल्या चे ह भ प निवृत्त महाराज देशमुख यांनी सांगितले
नेवासे तालुक्यातील वाकडी या येथे ,दिपावली महोत्सवा निमित्त,समाज प्रबोधनकार ह. भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांनी तालुक्यातील जनतेनेस प्रबोधीत केले,
या कार्यक्रमाचे आयोजन रासपचे विधानसभा अध्यक्ष संतोष काळे व मित्र परिवार,ग्रामस्थांनी केले यावेळी प्रमुख उपस्थितीत रासपचे ज्ञानेश्वर माऊली सलगर,अजीत पाटील,नानाभाऊ जुंधारे,संभाजी लोंढें,दत्तात्रय शिंदे,मा. जि.प.अध्यक्ष,विठ्ठलराव लंघे,तसेच तालुक्यातील,गावा तील इतर पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थं मोठ्या सं ख्येने उपस्थित होते
