
संगमनेर प्रतिनिधी
संगंनेरा शहरातील भाजी मंडईत त्रासदायक ठरणारी मोकाट जनावरांचा त्रास वाढल्याने दोन दिवसांमध्ये तब्बल पंधरा जनावरे पकडून पांजरपोळ येथे सोडण्यात आले.
नवभारत माहिती अधिकार पोलीस मित्र फौंडेशन संगमनेर येथील उपाध्यक्षा कल्पना काळे यांनी नगर पालिके कडे तक्रार करून भाजी मंडईतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन अंमलबजावणी करीत पालीका कर्मचाऱ्यांनी मोकाट जनावरे धरून नेली.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या
मार्गदर्शनाखाली अरविंद गुजर, सतीश बुरुंगुळे रवी गायकवाड आदींनी ही कार्यवाही केली.