कृषी व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा : सुजित झावरे

टाकळी ढोकेश्वर येथे कृषी केंद्राचे उद्घाटन
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर येथे वासुंदे येथील टोपले व गोफने परिवार यांच्या वतीने भूमिपुत्र कृषिसेवा केंद्राचे उद्घाटन सुजित झावरे पाटील यांचे शुभहस्ते तसेच सिताराम खिलारी यांचे अध्यक्षेखाली करण्यात आले.
यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की टाकळी ढोकेश्वर ही मोठी बाजारपेठ असून या भागात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या तरुणांनी शेती व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसायिक प्रगती साधली पाहिजे शेती व्यवसाय करून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्यवसाय केला पाहिजे आजच्या युवकांनी शेती व्यवसायामध्ये उतरून यशस्वी व्हावे व कृषी व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे यावेळी भूमिपुत्र कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सुजित झावरे यांनी वासुंदे येथील टोपले व गोपने या युवकांना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषीतज्ञ शिवाजीराव होळ, कृषीतज्ञ राहुल हांडे, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले तसेच यावेळी भागुजी दादा झावरे महेश पाटील ढुस, नारायण झावरे साहेब, दिलीप पाटोळे, पोपटराव झावरे, भगवान वाळुंज, खंडू कोळेकर, लहू जाधव, पांडुरंग टोपले, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब झावरे, खंडूजी टोपले, तुकाराम झावरे, अशोक पाटील रोकडे, दत्तात्रय काळनर, नागचंद ठाणगे, महादू भालेकर, मोहनराव रोकडे, शिवाजी रोकडे, विनायक वाळुंज, श्रावण गायकवाड, शिवाजी रोकडे, हनुमंत ठाणगे,
अशोक ठुबे सर, खंडू कोळेकर, युवा नेते गोकुळ शिंदे, चंदू कोकरे, दशरथ करगळ, अण्णा कोकरे, गणेश शिरतार, पांडुरंग आहेर, लक्ष्मण साठे, अमोल साठे, बाळासाहेब टोपले, संकेत थोपटे, प्रवीण गांगड, गणेश बर्वे, तोफिक राजे, गणेश शिरतार, ज्ञानेश्वर खराबी, बाळशिराम सैद, गणेश खंडाळे स्वप्निल शिंदे मयूर लगड कारभारी टोपले रुपेश ठुबे युवराज मदने तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.