राजूर येथे शासकीय आय टी आय मध्ये संविधान मंदिराचे उदघाटन

अकोले प्रतिनिधी
. भारताचे महामहीम उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या हस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता या विभागाअंतर्गत 434 शासकीय आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन संपन्न झाले.
सदर उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासकीय आयटीआय राजूर येथील संविधान मंदिराचे उद्घाटन राजुर गावच्या सरपंच सौ पुष्पाताई निगळे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजुर येथील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डी वाय देशमुख सर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांना भारताची लोकशाही व संविधान यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री. बादशहा ताजने सर, यांनी विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थेत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धाचे आयोजन केले व त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे गट निदेशक, श्री. नागरे ए. सी. यांनी केले या प्रसंगी एड. निगळे राजूरमधील व्यापारी रमेश मुर्तडक, पालक वर्ग, शासकीय आयटीआय व केळी कोतुळ येथील स्टाफ हजर होता. त्याचप्रमाणे संस्थेतील सर्व स्टाफ श्री. पालवे ए. ए. श्री., मोरे एस. जी., सौ. आगलावे सी. बी. श्री. गोरडे के. बी., श्री. बागवान, देठे, वाळेकर, पवार, श्री. खाडे सर, श्री कडू सर, चंडोले आदि उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीजतंत्री व्यवसायातील प्रशिक्षणार्थी केदार व कुमारी डगळे, यांनी केले. व शेवटी संस्थेतील शिल्प निदेशक श्री. मंडलिक एस. के. यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.