पारनेर तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न – सुजित झावरे पाटील.

म्हसे खुर्द , कोहोकडी , टोणगेवस्ती येथे विकास कामाचे भूमिपूजन
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
म्हसे खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्या दुरुस्ती करणे तसेच कोहोकडी येथे गावठाण व टोणगेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्ती, व संरक्षण भिंत बांधणे,सदर विकास कामांचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, पारनेर तालुक्यातील विकासकामांसाठी जिल्हा परिषद तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून तालुक्याचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न असेल, खर तर प्रेम कशाला म्हणतात हे मला आज कोहोकडी येथे आल्यावर समजल, स्व.वसंतराव झावरे पाटील यांच्या सोबत ज्यांनी कायम गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले असे निष्ठावान ज्येष्ठांनी आता पर्यंत कधी भाषण केले नाही

ते स्वतः हुन उठून प्रेमातून भाषण करतात. स्व. दादांवर आपण मनापासून प्रेम केलं दादांनी देखील कोहोकडी व परिसरात अनेक विकास कामे करून आपल प्रेमाचं नातं कायम टिकून ठेवलं. मी देखील जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना अनेक विकासकामे या भागातील गावांमध्ये करता आली. आज मी एक गोष्ट पाहिली ती म्हणजे आपण सर्व पालक शैक्षणिकदृष्ट्या जागृत आहात. मला आज अभिमान देखील वाटत की, माझ्या जिल्हा परिषद शाळेत देखील दर्जेदार शिक्षण दिलं जातं. आज कोणत्याही क्षेत्रात पाहिलं तर संगणक, वैज्ञानिक, शैक्षणिक, क्रीडा असे अनेक क्षेत्रात आपले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चमकतात. ही गुणवत्ता शिक्षकांनी टिकवून ठेवली आहे. आपल्या गावातील एकजूट, प्रेम हे माझ्या कुटुंबीयांवार आपण कायम ठेवली आहे हे मी कधीही विसरू शकणार नाही. पारनेर तालुक्यात सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी आणण्याचा सात्यताने प्रयत्न करणार. तालुक्याला विकासाच्या माध्यमातून उंचीवर नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.

यावेळी राहुल पाटील शिंदे, सचिन पाटील वराळ, पंकज कारखिले, कैलास कोठावळे, सरपंच मनोज मुंगसे, सरपंच डॉ. साहेबराव पानगे, संभाजी ठोणगे, तुळशीराम गायकवाड, तुषार पवार, विठ्ल चौधरी, रामदास ठोणगे, भानुदास ठोणगे, संजय झरेकर, नवनाथ खंडेकर, सोमनाथ गायकवाड, दत्तात्रय निकम, बाळासाहेब घोगरे, वाल्मीकराव ठोणगे, संजय झरेकर, अभिषेक जासूद, अनिल ढवण, अण्णा चौधरी, मच्छिंद्र चौधरी, संतोष चौधरी, राजेंद्र घोगरे, महाळू ढवण, मनोहर ठोणगे, भाऊसाहेब ढवण, दादाभाऊ कौटकर, बाबाजी चौधरी, बाबाजी ठोणगे, दिपक ठोणगे, बाजीराव ठोणगे, खंडू ठोणगे, आदेश कोळपे, शिवाजीराव ठोणगे, दगडु थोरात, बाबासाहेब फटांगारे, गोकुळ कळमकर, भाऊसाहेब ठोणगे, अरुण ठोणगे, दिलीप ठोणगे, अभिषेक जासूद, सागर दरेकर ग्रामसेवक, संपत चाबुकस्वार, प्रभाकर गायकवाड, महादू चौधरी, शिक्षक वर्ग व विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.