इतर

गुन्ह्यात अटक  न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजाराची लाच !

पोलीस अधिकारीच सापडला  लाचलुचपत च्या जाळ्यात !

     जळगाव-  जिल्ह्यातील   पारोळा पोलीस स्टेशन  चे पोलिस उपनिरीक्षक जयंवत प्रल्हाद पाटील
यांना  लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले 

तक्रारदार  व त्यांचे नातेवाईकावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ३४४/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ३४१, ३४२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे १२ ऑगस्ट २३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी तसेच  न्यायालयात दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी यातील तक्रारदार यांचे कडेस ३००००/ रुपयांची मागणी करून या अगोदर २००००/ रुपये घेतले व उर्वरित १००००/ रुपये नंतर घेवून या असे सांगितले.
त्यानंतर  दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी यातील आलोसे यांनी पंचा समक्ष १०,०००/हजाराची मागणी करून तडजोडअंती ८,०००/ स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

              सापळा पर्यवेक्षण अधिकारी सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक, सापळा व तपास अधिकारी एन. एन. जाधव, पोलिस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. बाळू मराठे, पो. कॉ. अमोल सुर्यवंशी, पो. कॉ. सचिन चाटे, कारवाई मदत पथक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक, स. फौ. दिनेशसिंग पाटील स. फौ. सुरेश पाटील, पो. ह. रविंद्र घुगे, म. पो. हे. कॉ. शैला धनगर, पो.ना. किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पो. कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button