कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी सुरू असलेली अवैद्य दारू विक्री बंद करा .-मनसे

राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या आयुक्त कार्यालयाचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन.
अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेले बारी जहागिरदारवाडी येथे वासाळी गावच्या हद्दीवर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसे हे अवैद्यरित्या विषारी दारू विक्री करत आहेत. सदर दारू विक्रीमुळे गावातील अनेक महिलांचे संसार हे उघड्यावर पडलेले आहेत.अनेकांचे घरातील लोक हे या अवैद्य दारू पिण्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत.त्याचप्रमाणे हे दारू विक्रेते अल्पवयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील अवैद्य दारूची विक्री करत आहेत.त्यामुळे देशाच्या भविष्याचा कणा असलेला युवक वर्ग देखील उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
त्याचप्रमाणे बारी जहागिरदारवाडी क्षेत्रात श्री क्षेत्र कळसुबाई देवस्थान असल्याने त्या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते.सदर दारू विक्रेत्यांकडे दारू पिणाऱ्या लोकांचे नेहमीच भांडण होत असल्याने त्याचा त्रास गावात येणाऱ्या पर्यटक लोकांवर होऊन पर्यटक व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच सदर दारू विक्रेते हे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना तसेच गावातील महिलांना देखील याचा भयंकर त्रास होत आहे.सदर अवैद्य दारू विक्रेते सुनील सोमा खादे व दुसरा दारू विक्री गुप्त चालवणारे लालू कसाळ हे अवैधरित्या वासाळी घाटातील बैलदेव मंदिराजवळील सांबरा वस्ती जवळ अवैध दारू विक्री करत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देखील नुकसान होत आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की बारी जहागिरदारवाडी गावच्या हद्दीवरील अवैद्य दारू गुप्तचालक सुनील सोमा खादे व लालू कसाळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सदर दारू अवैद्य गुप्ते हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अन्यथा महिलांकडून रास्तारोको आंदोलन करून सदर अवैद्य दारूचे गुप्ते उध्वस्त करण्यात येतील असा इशारा मनसेनी दिला आहे.
राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या आयुक्त कार्यालयाचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना मनसेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर लेंडे, गणेश खाडे, गुलाब कर्टूले, लता खाडे, सुनिता खाडे, इंदु खाडे, सुनंदा खाडे यांसह बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होते.