पारनेर सैनिक बँकेवर प्रशासक नियुक्तीची ती बातमी चुकीची – चेअरमन शिवाजी व्यवहारे

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
बँकेवर प्रशासक नियुक्त बाबतचे मा. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश नसताना सुद्धा विनायक गोस्वामी यांनी बँकेचे विरुद्ध कट कारस्थान करण्यासाठी सोशल मीडियावर चुकीच्या व खोट्या पोस्ट प्रसारित केल्या होत्या. पारनेर सैनिक बँकेवर प्रशासक नियुक्ती बाबतचे आदेश नाही प्रशासक नियुक्ती बाबतची बातमी चुकीची असल्याची माहिती पत्रकार परिषद मध्ये चेअरमन शिवाजी व्यवहारे यांनी दिली
यावेळी पुढे बोलताना व्यवहारे म्हणाले की, गोस्वामी यांनी बँकेवर प्रशासक नेमण्यासाठी मा. उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका क्रमांक 5209/2022 दाखल केलेली होती. सदरचे याचीकेमध्ये बँकेवर प्रशासक नेमणे बाबतचा कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नसून उलट मा. सहकार आयुक्त निबंध यांना निर्देशित केले की बँकेस बँकेची बाजू मांडण्याची योग्य ती संधी देऊन सदरचे तक्रार अर्जावर सुनावणी घेऊन सदरील अर्जाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा असे मा. उच्च न्यायालयाने सदरील निकाल पत्रांमध्ये नमूद केलेले आहे असे व्यवहारे म्हणाले
बँकेचे व्हा. चेअरमन भिमाजी साठे बोलताना म्हणाले की बँकेचे प्रगती उत्तम असून आज अखेर बँकेच्या ठेवी 134 कोटी असून कर्जवाटप 95 कोटी आहे तसेच गुंतवणूक 46 कोटी आहेत बँकेस आर्थिक वर्षांअखेर 1 कोटी 13 लाख इतका निव्वळ नफा झालेला आहे.
गोस्वामी यांचे बँकेमध्ये कोणत्याही प्रकारच्या ठेवी नाहीत किंवा त्यांचा बँकेच्या जडणघडणीमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही फक्त बँकेस बदनाम करण्याच्या दृष्टीने खोट्या व चुकीच्या बातम्या प्रसारित करून बँकेस बदनाम करण्याचे दुष्कृत्य करीत आहेत तरी बँकेचे सभासद ठेविदार व खातेदार यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती संचालक मंडळाच्या वतीने संजय तरटे यांनी दिली .
यावेळी बँकेचे संचालक नामदेव काळे, शिवाजी सुकाळे भास्कर पोपळघट संतोष गंधाडे श्रीकांत तोरडमल, दत्तात्रय सोले पाटील आदी उपस्थित होते.
बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या बातम्या खोट्या असून बातमी व पोस्ट प्रसारित करणारे गोस्वामी यांचे विरुद्धची पारनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून बँकेचे खातेदार ठेवीदार सभासद तसेच हितचिंतक यांनी या खोट्या व चुकीच्या बातम्या वर विश्वास ठेवू नये –श्री संजय कोरडे
(मुख्य कार्यकारी अधिकारी)
बँकेवर प्रशासक नेमणे बाबतचा कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही . विरोधकांकडे निवडणुकीसाठी बँकेविषयी कोणत्याही प्रकारचे भांडवल नसल्यामुळे संचालक मंडळास बँकेस बदनाम करण्याचे विरोधकांचे षड्यंत्र आहे –
कॅप्टन श्री नामदेव काळे– संचालक