आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा-अण्णासाहेब कटारे

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मुंबईत
महा अधिवेशन सम्पन्न
मुंबई(प्रतिनिधी):-
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे महा अधिवेशन यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालया समोर मुंबई येथे भव्य प्रमाणात राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
महा-अधिवेशनला राज्यासह इतर राज्यातून पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.
महा-अधिवेशनला संबोधित करीत असतांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा भारतीय संविधानावर निष्ठा व विश्वास असणार्या सर्वच समाजघटकांना सोबत घेऊन स्वताचे अस्तित्व निर्माण करून मैदानात उतरला आहे. मागील वर्ष भरात पक्षाने केलेल्या मतदारसंघा निहाय सर्वेक्षणाच्या अहवालाच्या अनुषंगाने राज्यातील किमान ७२ विधानसभा, ५ लोकसभा, ४ महानगरपालिका, १२ नगरपालिका, क्षेत्रात व अनेक जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या क्षेत्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्यास सक्षम आहे असे अण्णासाहेब कटारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
एस.सी,एस.टी,ओ.बी.सी यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारची बाधा न येता मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे,मराठा व धनगर समाजाच्या आरक्षण मागणीस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबाच आहे.

केंद्र व राज्यातील अनेक शासकीय उद्योग, संस्था यांचे मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरू आहे त्यामुळे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणे दुरापास्त होऊन गेले आहे त्यामुळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की खाजगी उद्योग धंद्यात देखील मागासवर्गीयांना आरक्षण असावे.
पुरोगामी व आंबेडकरवादी विचारसरणी अधिक सक्षम व मजबूत होणायसाठी पक्षाने समाज जोडो अभियान उभे करून “आम्ही रिपब्लिकन”(we are republican) हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने व जोमाने राबविले आहे त्याचाच परिणाम म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात सर्वच समाज घटक महाराष्ट्रात व देशातील काही राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षात दाखल होत आहे.
जाती व धर्माच्या आधारावर कार्यरत असलेले प्रस्थापित पक्ष अलीकडे अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे येथील मतदारांमध्ये देखील चलबिचल सुरू झालेली आहे येथील मतदारांना आधार व विश्वास रिपब्लिकन विचारधारच देऊ शकते ह्या खात्रीने पक्षाने मागील वर्षभरापासून रिपब्लिकन अभिनंदन हे अभियान सुरू केले आहे