शेवगाव तालुक्यात सुनील पहिलवान यांचा सत्कार

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील सुनील पहिलवान यांनी नुकत्याच श्रीरामपूर येथे झालेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत त दैदिप्यमान यश मिळवून चांदीची गदा मिळवली
. सुनील पहिलवान हे ग्रामीण भागामध्ये शालेय शिक्षणाबरोबर पत्रकरिता करत आहेत. त्याचबरोबर खेळामध्येही ते ते हुशार व चाणक्य आहेत त्यामुळेच त्यांना यापूर्वीही अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळत गेले आहे. त्यांच्या या यशामुळे मजलेशहरसह शेवगाव तालुक्यात विविध ठिकाणी त्यांचा गुणगौरव करण्यात आला. शेवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांच्यासह तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांचा गुणगौरव करण्यात आला. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे, जिल्हा अध्यक्ष सुरेशराव शेटे, संदीपराव बामदळे, तालुका अध्यक्ष नवनाथ ईसारवाडे, भाजपाचे वाय.डी.कोल्हे, बंडूशेठ रासने, ह.भ.प.राधेशाम महाराज बोरूडे,शेवगावचे पत्रकार रेवणाथ नजन, रामनाथ रुईकर, संदीप दारकुंडे, दादा डोंगरे, जयप्रकाश बागडे, ग्रामीण पत्रकार संघाचे आर. आर. माने, रवींद्र मडके, शहाराम आगळे, न्यू आर्ट कॉलेज शेवगावचे प्राध्यापक वसंत शेंडगे, सुखदेव गायकवाड, संतोष घरगणे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे यांनीही सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या