मुळा पाणलोटा तील आंबित धरण भरले!

कोतुळ प्रतिनिधी
मुळा नदीच्या उगमस्थाना कडे असणारे मुळा नदीवरील आंबीत धरण आज ओव्हर फ्लो झाले
यावर्षीच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यातील हे पहिले धरण ओव्हरफ्लो झाले आहे मुळा धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवार पासून घाटमाथ्यावर पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढला
गेल्या दोन दिवसापासून अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्याने डोंगर-दऱ्या ओलेचिंब झाले आहे घाटमाथ्यावरील ओढे-नाले वाहते झाले आहे यामुळे मुळा नदी वाहू लागली आहे हरिश्चंद्रगडाचे परिसरांचे मोठे पाणलोट क्षेत्र मुळा नदीला लाभल्याने या भागातून पावसाचे पाणी आंबित धरनातं स्थिरावले आणि आज शनिवारी सकाळी सात वाजता आंबीत धरण ओसंडून वाहू लागले
कोतुळ पूल पाण्याखाली जाणार
193 दशलक्ष घनफूट क्षमतेचे च्या आंबित धरणाच्या भिंतीवरून 200 ते 300 आजचा विसर्ग मुळा नदी पात्रात झेपावला यामुळे मुळानदी वाहू लागली आहे आंबित धरणातील हा प्रवाह आता पिंपळगाव खांड धरणा कडे झेपावला असून पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा वाढू लागला आहे मुळा धरण पाणलोट क्षेत्रात हरिष्चंद्रगड परिसर अंबित पाचनई कुमशेत या भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याने मुळा नदी वाहु लागली आहे मुळा नदी वाहती झाल्याने मुळा नदीवरील 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणात पाणीसाठा स्थिरावत असून पाणीसाठ्याच्या फुगवट्या मुळे मुळा नदीवरील अकोले – कोतुळ मार्गावरील कोतुळ पूल यावर्षी पुन्हा पाण्याखाली जाणार आहे यामुळे या मार्गावरील वाहतूक लवकरच बंद होणार आहे
दरम्यान पाणलोट क्षेत्रात पावसाने सर्वत्र समाधानकारक हजेरी लावल्याने परिसरात सध्या शेतकरीवर्ग शेतीच्या कामात व्यस्त असून शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग सर्वत्र सुरू आहे