पद्मशाली सखी संघम”च्या अध्यक्षपदी :माधवी अंदे तर, सचिवपदी : राधिका आडम..

.
कार्याध्यक्ष : वैशाली व्यंकटगिरी, सहकार्याध्यक्ष : लक्ष्मीबाई चिट्याल.
सोलापूर प्रतिनिधी
पद्मशाली समाजात अनेक महिला भगिनींना स्वत:चे कर्तृत्व आणि अस्तित्व सिद्ध करण्याची इच्छा बाळगून आहेत, हे ओळखून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने सोशल मिडिया च्या माध्यमातून पंधरा दिवसांपूर्वी ‘सोलापूर शहरात स्थायिक राहणाऱ्या पद्मशाली समाजातील महिला भगिनींसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्याची आवश्यकता आहे’. याला प्रतिसाद देत तब्बल दिडशे महिला भगिनींनी नांवनोंदणी केली होती.
रविवारी संध्याकाळी नांवनोंदणी केलेल्या महिलांची बैठक घेऊन त्यात नवीन महिला संघटनेचे नाव ‘पद्मशाली सखी संघम’ असे घोषित करण्यात आले होते. या नवनिर्वाचित संघटनेच्या अध्यक्षपदी माधवी श्रीनिवास अंदे, उपाध्यक्षपदी संध्याराणी राहूल अन्नम, सचिवपदी राधिका गोवर्धन आडम, सहसचिवपदी जमुना राजीव इंदापूरे, कार्याध्यक्षपदी वैशाली किशोर व्यंकटगिरी, सहकार्याध्यक्षपदी लक्ष्मीबाई नागभूषण चिट्याल, खजिनदारपदी प्रभावती विवेकानंद मद्दा तर सहखजिनदारपदी ममता नितीन मुदगुंडी यांची एकमताने निवड करण्यात आले आहे.